आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णाच्या आकड्यात झपाट्याने वाढ होतेय. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तर अनेकांनी यावर यशस्वी मातदेखील केली आहे. अभिनेता मनोज बाजपेयीदेखील नुकताच कोरोनातून यशस्वी बाहेर पडला आहे. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्याने कोरोनाच्या काळातील आपला वाईट अनुभव कथन केला आहे.
सुरुवातीच्या काळात परिस्थिती अधिकच बिकट झाली होती
हा एक 'कठीण प्रवास' होता, असे मनोज बाजपेयीने सांगितले आहे. कारण जेव्हा त्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता, तेव्हा त्याच्या पत्नीलादेखील कोरोनाची लागण झाली होती. आणि याकाळात ती आपल्या मुलीचादेखील सांभाळत करत होती. मनोजने सांगितल्यानुसार, क्वांरटाइनचे सुरुवातीचे दिवस अतिशय वेदनादायक होते आणि त्याची प्रकृती खालावली होती.
क्वारंटाइनच्या काळात काही शो आणि चित्रपट बघितले
मनोज बाजपेयीने पुढे सांगितले, "घरात क्वारंटाइन असताना स्क्रिप्ट रिडिंग आणि लोकांशी बोलण्यात व्यस्त राहिलो, जे इतर सामान्य दिवसांमध्ये मला करता येत नव्हते. याकाळात मी काही शो आणि चित्रपट देखील पाहिले. घरी आम्ही सर्व वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत होतो. आणि दुरूनच बोलायचो."
यादरम्यान मुलीपासून दूर राहणे खूप कठीण होते
मनोज पुढे म्हणाला, "या काळात मुलीपासून दूर राहणे खूप अवघड होते, कारण तिला माझ्यासोबत खूप वेळ घालवायचा होता. तिला माझ्याबरोबर खेळायचे होते. तिला तिच्या ऑनलाइन क्लास आणि होमवर्क करत असताना मी तिच्याजवळ हवा होतो. जे कोरोनामुळे मी करू शकले नाही."
मी इंडस्ट्रीतील माझे मित्र आणि चाहत्यांचा आभारी आहे
मनोज म्हणाला, "माझ्या इंडस्ट्रीतील मित्र आणि चाहत्यांचा मी मनापासून आभारी आहे. नीरज पांडे, अनुभव सिन्हा, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, अनुपम खेर यांच्यासह बरेच लोक सतत माझ्या संपर्कात राहिले आणि माझ्याकडून माझ्या आरोग्याविषयी माहिती घेत राहिले."
गेल्या महिन्यात मनोज बाजपेयीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी तो दिग्दर्शक कानू बहल यांच्या ‘डिस्पॅच’ चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. याच काळात कानू बहल यांनाही संसर्ग झाला होता. हे दोघेही पॉझिटिव्ह आल्यानंतर काही दिवसांसाठी शूटिंगही थांबवण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.