आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किस्से:मनोज बाजपेयीने सांगितले - तारुण्याच्या काळात शाहरुख खानसोबत बिडी आणि सिगारेट शेअर करायचो, पहिल्यांदा त्याच्याबरोबरच डिस्कोमध्ये गेलो होतो

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आम्ही दोघेही सिगारेट आणि बिडी शेअर करायचो.

अभिनेता मनोज बाजपेयीने अलीकडेच एका मुलाखतीत आपल्या तारुण्याच्या दिवसांना उजाळा दिला. यावेळी त्याने अभिनेता शाहरुख खानसोबतचे खास किस्से शेअर केले. वयाच्या विशीत असताना शाहरुख खानसोबत आपण सिगारेट आणि बिडी शेअर करायचो, असे मनोज बाजपेयीने या मुलाखतीत सांगितले आहे. यासोबतच शाहरुख पुर्वीपासूनच चार्मिंग असून तरुणींमध्ये प्रचंड लोकप्रिय होता, असेही मनोजने यावेळी सांगितले.

पहिल्यांदा शाहरुखसोबतच दिल्लीच्या एका डिस्कोथेकमध्ये गेलो होतो, असा खुलासादेखील मनोज बाजपेयीने केला आहे. हे दोघेही दिल्लीतील बॅरी जॉनच्या थिएटर ग्रुपमध्ये एकत्र होते. दिवंगत यश चोप्रा दिग्दर्शित 'वीर झारा'मध्ये मनोज आणि शाहरुखने एकत्र काम केले होते.

आम्ही दोघेही सिगारेट आणि बिडी शेअर करायचो
तारुण्यातील दिवसांना उजाळा देताना मनोज म्हणाला, "शाहरुख हा एकमेव होता जो त्याकाळी मारुती व्हॅनमध्ये येत असे. मला आठवते की, त्याच्याकडे लाल रंगाची मारुती व्हॅन होती. त्यानेच मला पहिल्यांदा दिल्लीच्या ताजमधील डिस्कोथेकमध्ये नेले होते. आम्ही दोघेही नुकतेच किशोरवयातून बाहेर आलो होतो आणि भेटलो होते. दिल्लीतील बॅरी जॉनच्या थिएटर ग्रुपमध्ये आम्ही एकत्र असायचो. त्याकाळी आम्ही सिगारेट किंवा बिडी जे शक्य होईल ते विकत घ्यायचो आणि एकत्र ते शेअर करायचो. शाहरुख पुर्वीपासूनच अतिशय चार्मिंग होता आणि आमच्या ग्रुपमध्ये तरुणींमध्ये प्रचंड लोकप्रिय होता,' अशी आठवण मनोजने सांगितली.

मनोजचा 'द फॅमिली मॅन 2' 4 जून रोजी प्रदर्शित होणार आहे
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, मनोज बाजपेयीची वेब सीरिज 'द फॅमिली मॅन 2' ही 4 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला. या सीरिजमध्ये मनोजशिवाय दक्षिणेची लोकप्रिय अभिनेत्री सामन्था अक्किनेनी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सामन्थाचा या सीरिजद्वारे डिजिटल डेब्यू होतोय.

शाहरुख लवकरच आगामी ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. त्याच्यासह दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. शाहरुख शेवटचा 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'झिरो' या चित्रपटात दिसला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

बातम्या आणखी आहेत...