आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता मनोज बाजपेयी सध्या त्याच्या आगामी 'गुलमोहर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला मनोज त्याची पत्नी नेहासोबत दिसला. विशेष म्हणजे बऱ्याच काळानंतर नेहा मीडियासमोर आली. आता या कपलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी नेहाच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. काही चाहत्यांनी तिला शनाया कपूर म्हटले आहे.
मनोजसोबत स्पॉट झाली नेहा
या व्हिडिओमध्ये नेहा मनोजसोबत पापाराझींना पोज देताना दिसतेय. यावेळी मनोज ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसला, तर त्याच्या पत्नीने ग्रे कलरच्या डेनिमसह ब्लॅक टॉप आणि जॅकेट घातले होते. नेहा मिनिमल मेकअप आणि सिंपल लूकमध्ये खूपच सुंदर दिसली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच चाहते नेहाच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
या कपलच्या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'व्वा, ती खूपच क्यूट दिसत आहे', तर आणखी एकाने लिहिले की, 'ती शनाया कपूरसारखी दिसते'. 'ही अभिनेत्याची पत्नी आहे, यावर विश्वासच बसत नाही,' अशी कमेंट एका यूजरने दिली.
कोण आहे मनोजची पत्नी नेहा?
नेहाचे आधीचे नाव शबाना रजा होते. नेहासोबतचे मनोजचे हे दुसरे लग्न आहे. त्याचे पहिले लग्न दिल्लीतील एका तरुणीसोबत झाले होते. पण नंतर त्यांचा घटस्फोट झाला. 1998 मध्ये मनोज पहिल्यांदा नेहाला भेटला होता. दोघांनी 2006 मध्ये लग्न केले आणि आता त्यांना एक मुलगी आहे. पीयूष पांडे यांनी लिहिलेले मनोजचे आत्मचरित्र 'मनोज बाजपेयी - कुछ पाने की जिद'मध्ये मनोजने खुलासा केला की, नेहाचा साधेपणा त्याला भावला होता.
नेहाचा साधेपणा भावला
चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी त्यांच्या एका टीव्ही मालिकेचे 100 भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका पार्टीचे आयोजन केले होत. या पार्टीत नेहा आणि मनोज पहिल्यांदा भेटले होते. मनोजने त्याच्या आत्मचरित्रात सांगितले की, "जेव्हा तो पार्टीत पोहोचला तेव्हा त्याला एक मुलगी विनामेकअप दिसली. तिने केसांत भरपूर तेल लावले होते आणि तिच्या डोळ्यावर चष्मा लागला होता. बॉलिवूडची कोणतीही नायिका केसांना तेल लावून पार्टीत येण्याचे धाडस करणार नाही. हाच नेहाचा साधेपणा मला भावला आणि मी तिच्या प्रेमात पडलो."
लग्नाआधी आठ वर्षे डेट केले
बायोग्राफीत मनोजने सांगितल्यानुसार, त्यावेळी नेहा डिप्रेशनमध्ये होती. कारण तिचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जवळजवळ फ्लॉप झाला होता आणि तिच्याकडे फक्त एक आगामी चित्रपट होता (होगी प्यार की जीत). आफ्टर पार्टीमध्ये दोघांनी बराच वेळ एकत्र गप्पा मारल्या आणि यादरम्यान शबाना काही काळासाठी तिची सर्व काळजी विसरली. यानंतर तिने मनोजची तिच्या कुटुंबियांशी ओळख करून दिली आणि लग्नाआधी दोघे आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.
'करीब' चित्रपटातून नेहाने केले होते पदार्पण
शबानाने नेहा या नावाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचा पहिला चित्रपट होता तो बॉबी देओल सोबतचा 'करीब'. त्यानंतर तिने अजय देवगणसोबत 'होगी प्यार की जीत' आणि हृतिक रोशनसोबत 'फिजा' चित्रपटात काम केले. 'फिजा' चित्रपटातील 'आजा माहिया' हे गाणे आजही प्रेक्षकांच्या तोंडी आहे. परंतु, गूगलवरही तिला शोधण्यासाठी शबाना नाही तर नेहा नावाचा उपयोग करावा लागतो.
बॉलिवूड चित्रपटासाठी बदलावे लागले नाव
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी चित्रपट निर्मात्यांनी शबानाला नाव बदलण्याची ताकीद दिली होती. शबानावर नाव बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आला. शबानाला असे करणे मुळीच पसंत नव्हते. एका मुलाखतीत तिने म्हटले होते की, 'माझ्या आई- वडिलांनी खूप प्रेमाने माझे नाव ठेवले होते. माझ्यावर दबाव टाकण्यात आला. मी या गोष्टीसाठी मुळीच तयार नव्हती. माझे नाव बदलायची गरज नव्हती पण कोणीही माझे ऐकले नाही.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.