आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Manoj Bajpayee Was Offered The Role Before Irrfan Khan In The Film Haasil, Director Tigmanshu Dhulia Told Why He Could Not Get The National Award

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हासिलची 17 वर्षे:इरफानच्या आधी मनोजला ऑफर झाली होती भूमिका,  तिग्मांशू धुलियाने सांगितले का नाही मिळू शकला नॅशनल अवॉर्ड

मुंबई (अमित कर्ण)एका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • 16 मे 2004 ला प्रदर्शित झालेल्या 'हासिल' चित्रपटात इरफानने निगेटिव्ह भूमिकेतसुद्दा आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.
 • निर्मात्यांसोबत दिग्दर्शन तिग्मांशू धुलिया याचा वाद झाला आणि त्यामुळे निर्मात्यांनी हा चित्रपट नॅशनल अवॉर्डसाठी पाठवलाच नाही.

16 मे 2004 ला प्रदर्शित झालेल्या 'हासिल' चित्रपटात इरफानने निगेटिव्ह भूमिकेतसुद्दा आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. या चित्रपटासाठी इरफानला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा  फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता,  काहि दिवसांपूर्वी दैनिक भासकरसोबत बोलताना या चित्रपटासाठी आधी मजोन बाजपेयीला विचारणा झाली होती, अशी माहिती दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांनी दिली. 

 • खलनायकाची भुमिका करण्यास मनोज बाजपेयीने दिला होता नकार

दिग्दर्शक तिग्मांशू सांगतात, रणविजय सिंहच्या भूमिकेसाठी मी मनोज वाजपेयीला विचारलं होतं, इरफान तर जवळचा मित्र होताच, मात्र मनोजलाही मी चांगला ओळखायचो, मात्र व्यस्त असल्यानं त्याने नकार देत सांगितलं की मला खलनायकाची भुमिका करायची नाही.  मी त्याला समजावून सांगितलं मात्र त्यावेळी त्याला काय वाटलं माहित नाही आणि त्याने नकार दिला.

माझ्या जवळ आणि काही पर्याय नव्हता, तर मी विचार केला की हा रोल आता इरफानकडूनच करून घ्यावा, इरफानला शूटिंग सुरु होण्याच्या 10 दिवस आधीच अलाहाबादला सोडलं होतं,  तिथं तो सगळ्यांसोबत मिसळला.  अलाहाबादच्या विर्द्यार्थी नेत्यांचा स्वभाव त्यानं जाणून घेतला. 

 • शूटिंगमध्ये आल्या अनेक अडचणी

जेव्हा मी चित्रपटाच्या शूटिंगसाठी अलाहाबाद विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गेलो, त्यावेळी माझ्याकडे परवानगी असूनही मला शूटिंग करता आली नाही, आम्ही अलाहाबाद विद्यापीठाची वाईट बाजू दाखवू म्हणून तिथल्या विद्यार्थी नेत्यांनी मला शूट करायला मनाई केली.  यावर मी त्यांना म्हणालो, जर रामायन बनवणार तर राम ही असणार आणि रावणही असणारच.

 • तब्बल एक वर्ष चित्रपटाला मिळाला नाही डिस्ट्रीब्यूटर

आम्ही चित्रपट तर बनवला मात्र एक वर्ष आम्हाला तो प्रदर्शितच करता आला नाही. आम्ही मुंबईतील सगळ्याच मोठ्या डिस्ट्रीब्यूटर, निर्माता, कलाकार यांना चित्रपट दाखवला सगळ्यांनी प्रशंसा केली  मात्र खरेदी कुणीच केला नाही, सगळ्यांना असचं वाटत होतं की इरफान सारखा नवा चेहरा पाहून लोक चित्रपटगृहाकडे वळतील का?  मात्र एक वर्षानंतर श्रृंगार फिल्मसने चित्रपटाला डिस्ट्रीब्युट करण्याची तयारी दर्शवली. पहिल्यांदा विशाल भारद्वाजने इरफानला पाहिलं आणि त्याला 'मकबूल'मध्ये घेतलं,  ंमकबूल' हा चित्रपट 'हासिल'नंतर बनायला सुरुवात झाला होता, मात्र तो आधी प्रदर्शित झाला. 

 • चित्रपटाला मिळाला कल्टचा दर्जा

या चित्रपटाला माझ्या निर्मात्यांनी पहिले योग्य पद्धतीने रिलीज केले नाही, त्यामुळे त्याला हवं तसं व्यावसायिक यश मिळू शकलं नाही. मात्र नंतर पुढच्या पिढीनं या चित्रपटाला डीव्हीडी आणि यूट्यूबवर पाहिलं आणि या चित्रपटाला कल्टचा दर्जा दिला. 

 • मिळू शकला असता नॅशनल अवॉर्ड

निर्माता चित्रपटाला व्यवस्थित प्रदर्शित करत नव्हता म्हणून माझं निर्मात्यासोबत भांडण झालं होतं, त्यामुळं त्यांनी चित्रपटाला नॅशनल अवार्डच्या नॉमिनेशनसाठी पाठवलं नाही. नाहीतर मला विश्वास होता, या चित्रपटासाठी मला किंवा इरफानला नेशनल अवार्ड नक्कीच मिळाला असता.

बातम्या आणखी आहेत...