आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘द फॅमिली मॅन 2’चे प्रदर्शन लांबणीवर:12 फेब्रुवारी रोजी नव्हे यावर्षी उन्हाळ्यात प्रदर्शित होणार मनोज बाजपेयीची वेब सीरिज, दिग्दर्शकाने शेअर केली पोस्ट

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रेक्षकांना या वेब सीरिजसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अभिनेता मनोज बाजपेयीची प्रमुख भूमिका असलेली ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजच्या दुस-या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे. ही वेब सीरिज 12 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार होती. मात्र आता याचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे. 'तांडव' आणि 'मिर्झापूर' या दोन वेब सीरिजमुळे निर्माण झालेल्या वादानंतर अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने मनोज बाजपेयीची वेब सीरिज आता रिलीज न करण्याच्या निर्णय घेतला आहे. दिग्दर्शक राज आणि डीके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

राज आणि डीके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून ‘द फॅमिली मॅन 2’ साठी प्रेक्षकांना आणखी थोडी प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज आणि डीके यांनी आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले, 'आम्हाला ठावूक आहे तुम्ही ‘द फॅमिली मॅन’च्या नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहात. त्यामुळे आमच्यावर इतकं प्रेम केल्यामुळे मनापासून धन्यवाद. पण तुम्हाला काही अपडेट्स द्यायचे आहेत. ‘द फॅमिली मॅन 2’ ही सीरिज उन्हाळ्याच्या सुट्टीत अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. एक चांगली कलाकृती तुमच्यासमोर सादर करता यावी यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे तुम्हाला ती नक्की आवडेल', अशी पोस्ट दिग्दर्शकांनी केली आहे.

राज आणि डीके यांनी आपल्या पोस्टमध्ये या वेब सीरिजच्या प्रदर्शनाची नेमकी तारीख जाहिर केलेली नाही. त्यामुळे प्रेक्षकांना या वेब सीरिजसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार हे नक्की झाले आहे.

या सीरिजमध्ये मनोज बाजपेयीसह प्रियामणी, समांथा अक्किनेनी, सीमा बिस्वास, सनी हिंदुजा, दर्शन कुमार, श्रेया धन्वंतरी, मिमे गुप्ता आणि एल अलगमपेरुमल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या वेब सीरिजच्या माध्यमातून समांथा अक्किनेनी डिजिटल डेब्यू करत आहे. यात ती रज्जी नावाच्या महिलेची भूमिका वठवणार आहे.

बातम्या आणखी आहेत...