आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्यदिन विशेष:देश प्रेम पडद्यावर आणणारे पहिले स्टार होते मनोज कुमार, अक्षय कुमारने 8 देशभक्तीपर चित्रपटांत केलंय काम

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोकांनी या कलाकारांच्या अभिनयाचे कौतुकही केले.

आज भारताचा 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा होतोय. स्वातंत्र्यदिनासाठी संपूर्ण देश उत्साही दिसतोय. हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजेच बॉलिवुडसुद्धा स्वातंत्र्यदिनाच्या आनंदात नेहमीच सहभागी असते. आजवर अनेक देशभक्तीपर चित्रपट बॉलिवूडमध्ये बनवण्यात आले आहेत. सोबतच या चित्रपटांमध्ये काम करणा-या कलाकारांनीही या चित्रपटांमध्ये दमदार परफॉर्मन्स देऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. लोकांनी या कलाकारांच्या अभिनयाचे कौतुकही केले. एक नजर टाकुया अशा काही सेलिब्रिटींवर ज्यांनी आपल्या करिअरमध्ये देशभक्तीपर चित्रपटांत काम केले...

मनोज कुमार

1967 मध्ये आलेल्या 'उपकार' चित्रपटात मनोज कुमार
1967 मध्ये आलेल्या 'उपकार' चित्रपटात मनोज कुमार

गतकाळातील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशावरील प्रेम किती महत्वाचे आहे, हा संदेश देण्यासाठी घालवले. पडद्यावर देशभक्ती गाजवणारे ते पहिले स्टार आहेत. पूरब और पश्चिम, उपकार, शहीद आणि क्रांती या चार चित्रपटांत दमदार अभिनय केल्यामुळे चाहत्यांनी त्यांना 'भारत कुमार' म्हणायला सुरुवात केली. 2015 मध्ये त्यांना प्रतिष्ठित फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशभक्तीपर चित्रपटांवरील त्यांचा हातखंडा बघून तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी त्यांना ‘जय जवान जय किसान’ या घोषणेवर चित्रपट बनवण्याचा आग्रह केला होता.

अक्षय कुमार

2015 मधील 'बेबी' चित्रपटामधील एका दृश्यात अक्षय.
2015 मधील 'बेबी' चित्रपटामधील एका दृश्यात अक्षय.

अक्षयला सध्याच्या काळातील मनोज कुमार म्हणतात. त्याने केसरी, गोल्ड, बेबी, एअर लिफ्ट, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, हॉलिडे: अ सोल्जर इज नेव्हर आउट ऑफ ड्यूटी, गब्बर, रुस्तम अशा देशभक्तीने भरलेल्या एकूण 8 चित्रपटांमध्ये काम केले आहे.

आमिर खान

2006 च्या 'रंग दे बसंती' मध्ये आमिर खान .
2006 च्या 'रंग दे बसंती' मध्ये आमिर खान .

वर्षभरात एक चित्रपट करणा-या आमिर खानने आपल्या कारकीर्दीत देशभक्तीपर अशा 4 चित्रपटांत भूमिका केली. सरफरोश, मंगल पांडे, रंग दे बसंती, लगान मधील त्याच्या कामाचे कौतुक झाले. चित्रपटांव्यतिरिक्त, आमिरने सत्यमेव जयते या सामाजिक विषयांवरील कार्यक्रम बनवला होता, जो टीव्हीवर खूप पसंत पडला होता.

शाहरुख खान

2007 मध्ये आलेल्या 'चक दे इंडिया'मध्ये शाहरुख
2007 मध्ये आलेल्या 'चक दे इंडिया'मध्ये शाहरुख

किंग ऑफ रोमान्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाहरुखने स्वदेश, चक दे ​​इंडिया असे देशभक्तीने परिपूर्ण चित्रपट केले. 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' हा हलका फुलका चित्रपट होता, ज्याच्या क्लायमॅक्समध्ये देशभक्तीची झलक होती. सोबत हॅपी न्यू इयर, वीर-जारा या चित्रपटांतही देशभक्तीची झलक दिसली.

सनी देओल

2001 मध्ये आलेल्या गदर चित्रपटात सनी देओल.
2001 मध्ये आलेल्या गदर चित्रपटात सनी देओल.

सनी देओल हा एक कलाकार आहे ज्याने 5 सर्वोत्कृष्ट देशभक्तीपर चित्रपटात काम केले. सनीने बॉर्डर, गदर एक प्रेम कथा, इंडियन, मां तुझे सलाम, हीरोज यासारखे देशभक्तीने परिपूर्ण चित्रपट दिले.

बातम्या आणखी आहेत...