आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अयोध्या रामलीला 2020:प्रयोग सुरु असताना चक्क संवाद विसरले मनोज तिवारी,  म्हणाले  'एक सेकंद-एक सेकंद'; आता सोशल मीडियावर होत आहेत ट्रोल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दूरदर्शन व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अयोध्येची रामलीला 5 कोटींपेक्षा जास्त जण लाइव्ह बघताहेत.

अयोध्येत आधुनिकतेच्या नव्या प्रयोगांसोबत सहिष्णुतेचा रंग घट्ट होत आहे. शरयूच्या काठावरील लक्ष्मण किल्ल्यात रामलीला सादर केली जात आहे. भव्य दिव्य सेट आणि प्रकाशझोतात रामलीलेचा रोमांच बॉलिवूडच्या कलाकारांनी वाढवला आहे. दिल्ली व मुंबईतील 120 कलाकारांचा ताफा अयोध्येत रामलीला सादर करत आहेत. 5 कोटींपेक्षा जास्त जण तिचे थेट प्रक्षेपण बघताहेत.

'रामलीला'मध्ये भोजपुरी अभिनेते आणि भाजप खासदार मनोज तिवारी यांनी अंगदची भूमिका साकारली आहे. मात्र अलीकडेच मंचावर अंगदच्या भूमिकेत आलेले मनोज तिवारी यावेळी चक्क आपले संवाद विसरले आणि अचानक त्यांच्या तोंडून 'एक सेकंद-एक सेकंद' असे निघाले. मग काय ट्रोलर्सच्या नजरेतून हे सुटले नाही आणि आता मनोज तिवारी यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.

एका ट्रोलरने हा हिंदीचा अपमान असल्याचे म्हटले आहे. तिवारींना स्पष्ट हिंदीदेखील बोलता येत नाही, असे काहींचे म्हणणे आहे.

मनोज तिवारी यांच्यापूर्वी गोरखपुरचे खासदार रवी किशन यांनीही रामलीलात सहभाग घेतला होता. यावेळी ते भरतच्या भूमिकेत दिसले होते.

दूरदर्शनच्या एचडी व्हॅनने रामलीलेचे प्रसारण, 55 जणांचे पथक
​​​​​रामलीलेच्या थेट प्रक्षेपणासाठी दूरदर्शनच्या 55 सदस्यांचे पथक दिल्लीहून येथे आले आहे. 9 एचडी कॅमेरे वेगवेगळ्या पद्धतीने मंचाचे चित्रीकरण करत आहेत. लक्ष्मण किल्ल्यावरील भव्य सेट उभा करण्यासाठी 9 दिवस लागले. तो हरिभाईंनी तयार केला आहे. 100 पेक्षा कारागीर त्यासाठी लागले होते.