आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन मुलींचे बाबा आहेत मनोज तिवारी:थोरली मुलगी रिती आहे ग्लॅमरस, फोटो पाहून चाहते म्हणाले- बिहार की लाली!

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भोजपुरी अभिनेते आणि राजकारणी मनोज तिवारी वयाच्या 51 व्या वर्षी तिसऱ्यांदा वडील झाले आहेत. सुरभी तिवारीने 12 डिसेंबर रोजी मुलीला जन्म दिला. मनोज तिवारी यांनी सोशल मीडियावर रुग्णालयात असलेल्या सुरभी यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, 'हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे की, माझ्या घरी लक्ष्मीनंतर आता सरस्वतीचे आगमन झालं असून आमच्या घरी गोंडस मुलीचे आगमन झाले आहे. तिला तुम्हा सर्वांचा आशिर्वाद मिळूदे! सुरभी-मनोज तिवारी' असे ते म्हणाले.

मनोज तिवारी यांनी वयाच्या 49 व्या वर्षी थाटले होते दुसरे लग्न
सुरभी ही मनोज तिवारी यांची दुसरी पत्नी आहे. पहिल्या पत्नीपासून मनोज यांना एक मुलगी असून तिचे नाव रिती तिवारी आहे. 2020 मध्ये मनोज यांनी सुरभीसोबत लग्नगाठ बांधली होती. वयाच्या 49 व्या वर्षी मनोज तिवारी यांनी दुसरे लग्न केले होते. पण त्यांनी हे लग्न बरेच दिवस लपवून ठेवले होते. मुलीच्या जन्मानंतर त्यांचे दुसरे लग्न झाल्याचे उघड झाले होते.

मनोज तिवारी यांनी सुरभीच्या आधी राणी तिवारीसोबत लग्न केले होते. 1999 मध्ये राणी यांच्यासोबत मनोज तिवारी यांनी लग्न केले होते. 13 वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी 2012 मध्ये घटस्फोट घेतला. राणी आणि मनोज यांना एक मुलगी आहे. घटस्फोटाच्या आठ वर्षांनंतर मनोज तिवारी यांनी सुरभीशी लग्नगाठ बांधली होती. घटस्फोटानंतर मनोज यांची थोरली मुलगी रिती त्यांच्यासोबत राहते. रिती स्वतःला लाइमलाइटपासून दूर ठेवते. आजच्या पोस्टमध्ये भेटुया रितीला...

रिती तिवारीला आहे गायनाची आवड
रिती तिवारीला तिच्या वडिलांप्रमाणे गाण्याची खूप आवड आहे. रितीचे इंस्टाग्राम अकाउंट तिच्या गाण्याच्या व्हिडिओंनी भरलेले आहे. मनोज तिवारी यांची मुलगी रिती तिच्या वडिलांप्रमाणेच हुशार आहे. रितीचे इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिल्यास तिचे एक नाही तर अनेक गाण्याचे व्हिडिओ पाहायला मिळतील. रिती कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नाही. रितीचे इंस्टाग्रामवर 7,108 फॉलोअर्स आहेत. लहान वयातच मोठे नाव कमावले

रिती जुनी या कंपनीची सह-संस्थापक देखील आहे. रितीने लहान वयातच मोठे नाव कमावले आहे. तिने स्वत:ला अभिनयापासून दूर ठेवले असले तरी सौंदर्यात ती बॉलिवूडच्या सौंदर्यवतींना मागे टाकते.

बातम्या आणखी आहेत...