आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेरोधाच्या सह-संस्थापकाला डेट करतेय मानुषी:लिव्ह-इनमध्ये सोबत राहत असल्याचे वृत्त, दोघांचे कुटुंबही एकमेकांच्या परिचयाचे

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. 2017 मध्ये मिस वर्ल्ड क्राऊन आपल्या नावे करणारी मानुषी व्यावसायिक निखिल कामत यांना डेट करत आहे. निखिल कामत फायनान्शिअल कंपनी झेरोधाचे सह संस्थापक आहेत. समोर येणाऱ्या वृत्तांनुसार दोघेही 2021 पासूनच एकमेकांना डेट करत आहेत आणि दोघांचे कुटुंबही एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतात.

2021 पासूनच करत आहेत डेट

हिंदुस्तान टाईम्सनुसार मानुषी आणि निखिल कामत 2021 पासूनच एकमेकांना डेट करत आहेत आणि आता सोबतही राहायला लागले आहेत. सूत्रांचे म्हणणे आहे की, दोघांचे कुटुंबही एकमेकांना चांगलेच ओळखतात. मानुषीचे पूर्ण लक्ष तिच्या बॉलीवूड करिअरवर आहे, त्यामुळे रिलेशनशिपविषयी जास्त चर्चा होऊ नये अशी तिची इच्छा आहे.

निखिल कामत विवाहित

निखिल कामत आधीपासूनच विवाहित आहेत. त्यांनी 2019 मध्ये इटलीच्या फ्लॉरेन्स शहरात अमांडा नावाच्या एका महिलेसोबत विवाह केला होता. मात्र एका वर्षातच दोघेही वेगळे झाले. वृत्तांनुसार 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. निखिल कामत फायनान्शिअल कंपनी झेरोधाचे सह संस्थापक आहेत.

2017 मध्ये मिस वर्ल्ड बनली होती मानुषी

मानुषी छिल्लर 2017 मध्ये मिस वर्ल्ड बनली होती. प्रियंका चोप्रानंतर 17 वर्षांनी एखाद्या भारतीय सौंदर्यवतीला हा किताब मिळाला होता. मॉडेलिंगमध्ये येण्यापूर्वी मानुषी एक मेडिकल स्टुडंट होती. तिने 2022 मधील पृथ्वीराज या सिनेमातून बॉलीवूड करिअरला सुरुवात केली होती. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला.

बातम्या आणखी आहेत...