कोरोनाविरुद्ध मोहीम / ग्लोबल कॅम्पेन ‘होम टीम हीरो’मध्ये योगदानासाठी सहभागी झाली मानुषी

  • मानुषीने मदतीचा हात पुढे केला आहे.

दिव्य मराठी

May 23,2020 11:50:00 AM IST

मुंबई. जगातील सर्वांत मोठे फिटनेस ब्रांड कोराेना व्हायरसमुळे जे लोक अडचणीत आहे त्यांच्यासाठी निधी जमवत आहेत. या त्यांच्या उपक्रमात मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सहभागी झाली आहे.

मानुषी ‘होम टीम हीरो’नावाच्या एका ग्लोबल कॅम्पेनचा एक भाग आहे. ज्यात अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू लियोनेल मेस्सी, डेविड बेकहम, क्रिकेटर रोहित शर्मा सारखे लोक सहभागी आहेत. या उपक्रमाअंतर्गत कुठूनही कोणत्याही व्यक्तीने प्रत्येक तासाला केलेले वर्कआऊट, ब्रांडला एक डॉलर दान करण्यासाठी प्रेरित करणार आहे.

मानुषी म्हणाली,‘कोरोना व्हायरसच्या आजाराने पीडित लोकांसाठी जागतिक स्तरावरील वर्कआउटमध्ये सहभागी होऊन मदत करण्याची ही एक चांगली संधी आहे. कोविड-19 निधीसाठी मी जो काही प्रयत्न करत आहे. त्याबद्दल मला अभिमान आहे.’

X