आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मास्टरजींचा राग:काजोल, जुहीसह अनेक अभिनेत्रींना सरोज खान यांचा खावा लागला होता ओरडा, करीनावर चिडत म्हणाल्या होत्या - 'ऐ मुली कंबर हलव'

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरोज खान यांना बॉलिवूडमध्ये मास्टरजी म्हणून सगळे हाक मारायचे.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांनी शुक्रवारी पहाटे मुंबईतील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सरोज खान यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठिक नव्हती. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. सरोज खान यांना बॉलिवूडमध्ये मास्टरजी म्हणून सगळे हाक मारायचे. त्यांच्या कोरिओग्राफीमुळे अनेक अभिनेत्रींच्या करिअरला योग्य दिशा मिळाली. सरोज खान सेटवर अतिशय कडक असायच्या. जुही चावलापासून ते करीना कपूरपर्यंत अनेक अभिनेत्रींना त्यांच्या रोषालादेखील सामोरे जावे लागले आहे.

  • करीनाला सर्वांसमोर सरोज यांचा ओरडा सहन करावा लागला होता

सरोज खान यांनी करीना कपूरवर चित्रीत झालेली 'ये इश्क हाय' आणि 'दिल मेरा मुफ्त' ही गाणी कोरिओग्राफ केली होती. ही दोन्ही गाणी खूप लोकप्रिय झाली. अलीकडेच डान्स इंडिया डान्सच्या सेटवर करीनाने सरोज यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला होता. 'दिल मेरा मुफ्त' या गाण्याच्या शूटिंगदरम्यान त्यांचा ओरडा सहन करावा लागल्याचा किस्सा करीनाने यावेळी शेअर केला. एकेदिवशी अर्ध्या रात्री सरोज खान यांना करीनाच्या डान्स मुव्स पसंत पडत नव्हत्या, तेव्हा त्या करीनाला ओरडल्या. ऐ मुली कंबर हलव. रात्रीचा एक वाजत आलाय तू काय करत आहेस? असे त्या ओरडून करीनाला म्हणाल्या होत्या.  याशिवाय करीनाने  जब वी मेट आणि  अजनबी या चित्रपटांच्या गाण्यांच्या शूटिंगचे मजेदार किस्सेही शेअर केले.

  • काजोल, आमिर आणि जूही यांना म्हटले होते निर्लज्ज 

1997 मध्ये रिलीज झालेल्या 'इश्क' या चित्रपटातील गाण्यांची कोरिओग्राफीदेखीर सरोज यांनीच केली होती. एका मुलाखतीत अभिनेत्री काजोलने सर्व कलाकारांना सरोज खान यांच्या रागाला कसे सामारे जावे लागले होते, तो किस्सा शेअर केला होता.  या चित्रपटातील एक गाणे चार मुख्य कलाकारांवर चित्रीकरण करण्यात आले होते ज्यांचे नृत्य दिग्दर्शन सरोज यांनी केले होते. काजोलने सांगितल्यानुसार, आम्ही चारही जण स्टेप करत होतो, अचानक सरोज  कट, कट.. म्हणून ओरडल्या.  किती निर्लज्ज आहात तुम्ही... तुम्हाला अजयसारखा डान्स करायचा आहे. तुम्ही काय करत आहात? फक्त अजय माझ्या स्टेप फॉलो करतोय, असे त्या मला, आमिरला आणि जुहीला म्हणाल्या होत्या.  खरं तर अजय देवगन चांगला डान्सर नाही, त्यामुळे सरोज यांचे हे म्हणणे ऐकून आम्ही सगळे हैराण झालो होतो, असे काजोल म्हणाली होती.

  • शाहरुखला मारली होती थापड 

करिअरच्या सुरुवातीला शाहरुखने सरोज खानसोबत बर्‍याच सर्वोत्कृष्ट गाण्यांमध्ये काम केले आहे. एका मुलाखती दरम्यान शाहरुखने सांगितले की, त्यावेळी जास्त काम असल्याने तो तीन शिफ्टमध्ये काम करायचा. एकदा त्याने सर्वांसमोर म्हटले होते की, तो काम करुन थकला आहे. त्यावर सरोज यांनी त्याला हळू थापड मारत म्हटले होते की, माझ्याकडे बरेच काम आहे असे कधीही म्हणू नये.

बातम्या आणखी आहेत...