आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलविदा अनुपम श्याम:अभिनेते अनुपम श्याम यांना कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली, CM योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले दुःख

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनुपम श्याम यांच्या उपचारांसाठी 20 लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती.

बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम ओझा यांचे वयाच्या 63 व्या वर्षी निधन झाले. त्यांना 6 दिवसांपूर्वी गोरेगाव येथील एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांनी रविवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक अवयव निकामी झाल्यामुळे अनुपम श्याम यांचे निधन झाले आहे.

त्यांच्या निधनाची बातमी आल्यापासून चाहत्यांसह अनेक बॉलिवूड आणि टीव्ही सेलेब्स सोशल नेटवर्किंगवर पोस्ट शेअर करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत ​​आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि लिहिले, 'सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम श्याम ओझा यांचे निधन अत्यंत दु: खद आहे. माझी संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. प्रभू श्री राम यांना प्रार्थना करतो की त्यांच्या दिवंगत आत्म्याला शांती लाभो.' अनुपम यांना किडनीच्या उपचारासाठी मागील वर्षी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी अनुपम यांनी त्यांची आर्थिक स्थिती बेताची असल्याचे सांगितले होते आणि कलाकारांकडे मदत मागितील होती. त्यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनुपम श्याम यांच्या उपचारांसाठी 20 लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती.

अभिनेता मनोज जोशी यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहेत. त्यांनी लिहिले, "आमचे मित्र आणि प्रतिभावान अभिनेते अनुपम श्याम यांच्या निधनाने खूप दुःख झाले. आम्ही एक चांगला माणूस गमावला. कुटुंबाप्रती माझी संवेदना."

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मनोज जोशी यांच्यासह अभिनेता यशपाल शर्मा, गायिका मालिनी अवस्थी यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अनुपम श्याम यांनी श्याम बेनेगल यांच्या 'सरदारी बेगम' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अनेक लोकप्रिय टीव्ही शोजमध्ये काम केलेल्या अनुपम श्याम यांनी 'दिल से', 'सत्या', 'शक्ती', 'हल्ला बोल', 'दुश्मन', 'स्लमडॉग मिलेनिअर', 'वाँटेड', 'मुन्ना मायकल', ' रक्तचरित्र' , 'बँडिट क्वीन', 'नायक', 'परजानिया', 'दास कॅपिटल', 'पान सिंह तोमर', 'हजार चौरासी की मां', 'दुश्मन', 'जख्म', 'कच्चे धागे', 'तक्षक', 'बवंडर', 'नायक', 'कसूर', आणि 'लगान'सह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...