आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Many Films Of Many Stars Including Shahrukh Aamir Did Not Appear On The Big Screen For 2 3 Years But Most Of The Brand Endorsement Was With Them.

स्टार्सची अ‍ॅड इकॉनॉमी:मागील 2-3 वर्षांपासून अक्षय-शाहरुख-रणवीर सारख्या बड्या स्टार्सचे चित्रपट झळकले नाहीत, पण यांच्याकडेच आहेत सर्वाधिक ब्रँड एंडोर्समेंट

मनीषा भल्लाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाहरुखचा शेवटचा चित्रपट 2018 मध्ये आला होता आणि तो फ्लॉप ठरला होता, तरीही किंगचा दर्जा अबाधित आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लोकांनी एका वर्षापेक्षा जास्त काळ मोठ्या स्क्रीनवर कोणताही चित्रपट पाहिला नाही. देशात आलेल्या दुस-या लाटेमुळे पुढील काही महिने हीच परिस्थिती राहील, अशी चिन्ह आहेत. अनेक बड्या स्टार्सचे बहुतेक चित्रपट रखडले आहेत. इतकेच नाही तर अक्षय कुमार, शाहरुख खान, रणवीर सिंगसारखे स्टार्स तर मागील दोन ते तीन वर्षांपासून मोठ्या पडद्यावर दिसले नाहीत. मोठ्या पडद्यावरील जरी हे कलाकार झळकले नसले तरी शाहरुख आणि आमिर सारख्या स्टार्सच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये फारसा फरक पडलेला दिसून येत नाही.

सलमान खानचा 'राधे' 13 मे रोजी रिलीज होत आहे. यापूर्वी सलमानचा 'दबंग 3' 2019 मध्ये आला होता. राधेद्वारे तब्बल दोन वर्षांनंतर सलमान मोठ्या पडद्यावर परतत आहे, परंतु 'राधे' देशातील बहुतेक ठिकाणी लॉकडाउन असल्याने मोजक्याच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय. तर याकाळात सलमानने आपला चित्रपट ओटीटीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. सलमानचा फ्रेश चित्रपट प्रेक्षकांच्या ओटीटीवर बघायला मिळेल, पण शाहरुख तर गेल्या तीन वर्षांपासून मोठ्या पडद्यावर दिसलाच नाही. त्याचा शेवटचा चित्रपट झिरो 2018 मध्ये आला होता. तो फ्लॉप ठरला होता. मोठ्या पडद्यावरचा शाहरुखची शेवटचा हिट ठरलेला चित्रपट रईस हा होता. हा चित्रपट 2017 मध्ये आला होता. आता त्याचा आगामी चित्रपट 'पठाण' 2022 मध्ये येऊ शकतो. अन्य स्टार्स ओटीटीकडे आपला मोर्चा वळत आहेत, परंतु शाहरुख अद्याप या विचारात दिसत नाही. तरीही, शाहरुख ब्रँड एंडोर्समेंटच्या बाबतीत टॉप स्टार्सपैकी एक आहे.

ओटीटी वर कोण आले?
अक्षय कुमारचा 'लक्ष्मी' हा चित्रपट यापूर्वी ओटीटीवर प्रदर्शित झाला. आणि आता सलमान खान 'राधे'सह ओटीटीवर पाऊल ठेवत आहे. पण हे दोघेही आनंदाने या माध्यमाकडे वळले असे नाही. सध्याच्या लॉकडाउन परिस्थितीमुळे त्यांना ओटीटीवर यावे लागले आहे. शाहरुख आणि आमिर खान अद्याप ओटीटीकडे वळले नाहीत. सध्या हृतिक रोशन ओटीटीसाठी वेब सीरिज बनवणार असल्याची चर्चा नक्कीच आहे.

सोशल मीडियापासूनही दुरावले
शाहरुखने गेल्या पाच महिन्यांत इंस्टाग्रामवर मोजून पाच पोस्ट टाकल्या असतील. आमिरने तर काही काळासाठी सोशल मीडिया रामराम ठोकला आहे. या दोघांपेक्षा सलमान सोशल मीडियावर अधिक अ‍ॅक्टिव असतो आणि आता तर 'राधे'च्या निमित्ताने तो सोशल मीडियावर अधिक सक्रीय दिसतोय. अक्षय कुमार यावर्षी 'लक्ष्मी' चित्रपटाचे प्रदर्शन आणि 'राम सेतु'च्या शूटिंगमुळे सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव दिसला आहे.

कतरिना आणि दिशाला दमदार भूमिका मिळत नाहीत, परंतु तरीही त्यांना जाहिराती मिळतात भारतीय सिनेमाच्या इतिहासात कतरिना कैफने साकारलेले संस्मरणीय पात्र कोणते? असा प्रश्न जर एखाद्याला विचारला तर याचे उत्तर देण्यासाठी नक्कीच विचार करावा लागणार आहे. मात्र ब्रँड एंडोर्समेंटमध्ये कतरिनाचे एक वेगळे वलय दिसून येते. शू, मोबाइल, हेअर ऑईल ते ज्यूसपर्यंत विविध ब्रँडमध्ये कतरिना चर्चेत आहे. कदाचित दिशा पाटनीचेही तिच्याच पावलावर पाऊल आहे. दिशाने पाच वर्षात आठ चित्रपट केले आहेत. आता तिचा राधे रिलीज होत आहे, पण ब्रँड एंडोर्समेंटमध्ये दिशा बरीच पुढे आहे.

स्टार्सची क्रेझ लवकर कमी होत नाही
स्टार्सच्या ब्रँड व्हॅल्यूबद्दल भास्करशी बोलताना अ‍ॅड गुरू प्रह्लाद कक्कर म्हणाले, 'ए लिस्टरचा पगडा 2-4 वर्षे कमी होत नाही, जर ए लिस्टर स्टारने चित्रपट केले नाहीत, तर देखील काहीही न कररता तो दहा किंवा त्याहून अधिक वर्षे इंडस्ट्रीवर राज्य करु शकतो. कारण, सुपरस्टारचा मोमेंटम आधीपासूनच बनलेला असतो आणि तो सहज पडत नाही. त्याचे चित्रपट नवीन असो किंवा जुने ते टेलीव्हिजनवर पाहायला मिळतात. टेलिव्हिजनवर येणा-या चित्रपटांमध्ये कोणीही त्यांची जागा घेऊ शकत नाही.'

एंडोर्समेंट बॉक्स ऑफिसवर नव्हे तर चेह-यांवर चालते
बॉलिवूड आर्टिस्ट बँक या सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीचे संचालक जावेद अली यांनी 'भास्कर'ला सांगितले की, दीपिका पदुकोणचा 'छपाक' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. मात्र तरीही तिने लग्नानंतरचे तिचे फिल्मी करिअर आणि प्रोफेशनल लाइफ सांभाळले आहे, तर करीना कपूर आणि अनुष्का शर्मा सध्या बॅकफूटवर गेल्या आहेत. त्यामुळे बाजारात दीपिकाशिवाय दुसरा चेहरा नाही. सध्याच्या काळात दीपिका आणि आलिया भट्ट यांची जाहिरातींमध्ये चलती आहे. आगामी काळात सारा अली खान त्यांना रिप्लेस करु शकते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जाहिरांतीच्या विश्वात चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन नव्हे तर चेहरा चालतो. यामुळेच आजही अमिताभ बच्चन बर्‍याच जाहिरातींमध्ये दिसतात.

बातम्या आणखी आहेत...