आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 डिसेंबरपासून टीव्ही पाहणे अधिक महाग होणार:स्टार, वायकॉम, झी आणि सोनीचे अनेक प्रीमियम चॅनेल यापुढे बुकेत उपलब्ध होणार नाहीत, त्यासाठी मोजावे लागतील जास्तीचे पैसे

हिरेन अंतानी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुकेत समाविष्ट केलेल्या वाहिन्यांच्या किंमती निश्चित करण्याचा परिणाम

1 डिसेंबरपासून टीव्ही बघणे महाग होणार आहे. त्याचे कारण म्हणजे 1 डिसेंबरपासून टीव्ही चॅनल्सची बिले वाढणार आहेत. देशातील आघाडीचे ब्रॉडकास्टिंग नेटवर्क वायाकॉम, झी, स्टार आणि सोनीने काही चॅनल्स त्यांच्या बुकेतून बाहेर काढत त्यांच्या किंमती वाढवल्या आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या नवीन दर आदेशाच्या अंमलबजावणीमुळे या किंमती वाढत आहेत. हा आदेश कायम ठेवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे, परंतु त्यावर त्वरित स्थगिती आली नाही. 30 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे.

बुकेत समाविष्ट केलेल्या वाहिन्यांच्या किंमती निश्चित करण्याचा परिणाम
ब्रॉडकास्टिंग नेटवर्कच्या बुकेत देण्यात येणाऱ्या चॅनेलचे मासिक दर आधी किमान 19 रुपये निश्चित करण्यात आले होते, परंतु ट्रायच्या नवीन टेरिफ ऑर्डरमध्ये ते किमान 12 रुपये निश्चित करण्यात आले आहे. देशातील केवळ 7% टीव्ही व्युअर्स अ ला कार्ट तत्त्वावर चॅनेलची सदस्यता घेतात. उर्वरित 93% संपूर्ण बुके सब्सक्राइब करतात.

या स्थितीत चॅनल्सना त्यांचे बहुतेक चॅनेल फक्त 12 रुपयांमध्ये देणे अत्यंत तोट्याचे ठरू शकते. हे नुकसान कमी करण्यासाठी, नेटवर्कने काही लोकप्रिय वाहिन्या बुकेतून काढून त्यांच्या किमती वाढवण्याचा विचार केला आहे. यामध्ये क्रीडा, प्रादेशिक आणि सामान्य मनोरंजन श्रेणीतील अनेक वाहिन्यांचा समावेश आहे.

ज्यांना या वाहिन्यांची सवय आहे ते जास्त दर देऊन अ ला कार्ट तत्वावर सदस्यता घेतील अशी ब्रॉडकास्ट नेटवर्क्सला अपेक्षा आहे.

NTO 2.0 चा वाद काय आहे

  • TRAI ने मार्च 2017 मध्ये टीव्ही चॅनेलच्या किंमतींबाबत नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO) जारी केली होती. त्यानंतर 1 जानेवारी 2020 रोजी NTO 2.0 जारी झाला.
  • देशातील प्रसारण नेटवर्कची संघटना इंडियन ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल फाउंडेशनने टीव्ही प्रोड्यूसर्स असोसिएशनसह मिळून या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. 30 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाने ट्रायच्या बाजूने निकाल दिला.
  • आयबीएफ आणि इतर याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळालेली नाही.
  • TRAI ने सर्व ब्रॉडकास्टिंग नेटवर्कला सांगितले आहे की, सध्या NTO वर स्थगिती नाही, त्यामुळे त्याचे पालन करणे आवश्यक आहे. अंमलबजावणीचा अहवाल 10 दिवसांच्या आत द्यावा.
  • यामुळे, सर्व नेटवर्क NTO 2.0 नुसार त्यांच्या चॅनेलच्या किंमती बदलत आहेत.

चॅनेलसमोर OTTचे फायदे
इलारा कॅपिटलचे सीनिअर व्हाइस प्रेसिडेंट आणि मीडिया आणि एंटरटेन्मेंट रिसर्च अॅनालिस्ट करण तौरानी म्हणाले, 'आमच्याकडे अजूनही खूप कमी ग्राहक अ ला कार्ट तत्त्वावर चॅनेलला प्राधान्य देतात. अनेक महागडे चॅनेल अ ला कार्ट वर सब्सक्राइब करण्याऐवजी ते ओटीटीकडे वळतील.'

उदाहरणार्थ, झी नेटवर्कच्या प्रीमियम चॅनेलची मासिक सदस्यता 22 रुपये असेल. यापेक्षा जास्त, जर ग्राहक जी 5 ओटीटी प्लॅटफॉर्मवर शिफ्ट झाले तर त्यांना दर महिन्याला 42 रुपये प्रति महिना दराने झीचे सर्व चॅनेल तसेच ओरिजिनल वेब सीरिज बघायला मिळतील.

बातम्या आणखी आहेत...