आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोककळा:प्रसिद्ध दिग्दर्शक बासु चटर्जींच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा, अमिताभ बच्चन, शबाना आझमी यांच्यासह अनेक कलाकारांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली 

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

रजनीगंधा, शौकीन,  'चितचोर', ‘छोटीसी बात’, ‘चमेली की शादी’, ‘खट्टा मीठा’, ‘एक रुका हुआ फैसला’ मंजिल, कमला की मौत हे आणि असे एकाहून एक सरस सिनेमा देणारे बासूदा म्हणजेच दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अमिताभ यांनी 'मंजिल'मध्ये केलं होतं सोबत काम

मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी 1979 च्या ‘मंजिल’ या चित्रपटात बासू दा यांच्याबरोबर काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन बासूदा यांनी केले होते. त्यांच्या निधनाची दु: खद बातमी ऐकून बिग बींनी लिहिले की, 'बासू चटर्जी एक शांत, मृदूभाषी आणि सभ्य माणूस. त्यांचे चित्रपट मध्य भारतातील जीवनाचे वर्णन करतात.  त्यांच्यासोबत मी मंजिल हा चित्रपट केला होता. एक मोठे नुकसान. या ऋतुत त्यांचे 'रिम झिम गिरे सावन' हे गाणे आठवते. हे गाणे त्यांच्या मंजिलमधील असून ते ब्लॉकबस्टर ठरले होते.' 

शबाना आझमी यांनी त्यांच्यासोबत 3 चित्रपट केले 

बासू चटर्जी यांच्या निधनाच्या बातमीने शबाना दु: खी झाल्या आहेत. आपले दुःख व्यक्त करताना त्यांनी लिहिले, 'बासू चटर्जी यांच्या निधनाच्या बातमीने मी खूप दुःखी झाले आहे.   अनेक चित्रपट देणारे फिल्ममेकर. 'स्वामी', 'अपने पराये' आणि 'जीना यहाँ' या 3 चित्रपटांत त्यांच्यासोबत काम करण्याचे भाग्य मला लाभले.' 

'गुलाबो सीताबो'चे दिग्दर्शक शुजित सरकार यांचे पहिले काम

अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांच्यासोबत 'गुलाबो सीताबो' हा चित्रपट  घेऊन येणारे शुजित सरकार यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात बासूदांबरोबर केली होती. त्यांच्या निधनावर शुजीत यांनी ट्विटरवर लिहिले की, "म्हणून माझी पहिली नोकरी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून बासूदांसोबत बंगाली टीव्ही सीरियलसाठी होती.  ज्याचे शूटिंग सीआर पार्क दिल्ली येथे झाले होते. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.'

बासू दा मध्यमवर्गीय जीवनाची खरी पात्रं लिहायचे

ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांनी बासूदा यांचे कौतुक करताना लिहिले की, "कोणीही मध्यमवर्गीय व्यक्तीच्या आकांक्षा व चिंता व्यक्त करू शकत नाही, पण बासू चटर्जी यांनी त्या केल्या. त्यांची स्क्रिप्ट एका सामान्य माणसाशी मिळती-जुळती आणि जवळची होती. कलाकार आज गेले आहेत. आपले स्थान नेहमीच आमच्या हृदयात राहील.' 

विनोदी चित्रपटांसाठी नेहमीच लक्षात राहतील 

चित्रपट दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनीही बासू चटर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी ट्विटरवर लिहिले, 'ज्येष्ठ चित्रपट निर्माते श्री बासु चटर्जी यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांच्या हलक्या फुलक्या विनोदी आणि साध्या चित्रपटांसाठी ते नेहमीच लक्षात राहतील. ओम शांती.'

बातम्या आणखी आहेत...