आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्तच्या आजारपणाविषयी नवीन अपडेट:कुटुंबीयांनी केला नाही संजयच्या आजाराचा खुलासा, पत्नी मान्यता म्हणाली - संजू पुर्वीपासूनच लढाऊ वृत्तीचा आहे, ही वेळही निघून जाईल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दत्त कुटुंबीयांकडून संजयच्या आजारपणाबद्दल खुलासा करण्यात आलेला नाही.

अभिनेता संजय दत्तचा फुफ्फुसांच्या कर्करोग अॅडव्हान्स स्टेजमध्ये असल्याचे समजते. त्याच्या आजारपणाची ही बातमी मंगळवारी रात्री समोर आल्यानंतर चाहते आणि बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला. संजय दत्तची पत्नी मान्यता लॉकडाऊनपासून दोन्ही मुलांसोबत दुबईत अडकली होती. पण त्याच्या आजापणाचे कळताच ती मंगळवारी रात्री मुंबईत पोहोचली आहे. आता मान्यताने एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये तिने संजूच्या चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. सोबतच तिने यात संजयच्या आजारपणाबाबत काहीही सांगितलेले नाही. मात्र संजयचा एका फायटर म्हणून उल्लेख केला आहे.

मान्यताने एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये ती म्हणाली- संजूच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांची आवश्यकता आहे. या कुटुंबाने यापूर्वी खूप काही सहन केले आहे, परंतु मला खात्री आहे की ही वेळ देखील निघून जाईल. आपणा सर्वांना माझी विनंती आहे की, संजूच्या चाहत्यांच्या कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये. आम्हाला मदत करा आणि आपले प्रेम असेच कायम ठेवा. संजू कायमच लढाऊ वृत्तीचा आहे. आणि म्हणून आमचे कुटुंब प्रत्येक कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरे गेले आहे. हे आव्हान देऊन भगवंताने पुन्हा एकदा आमची परीक्षा घेतली आहे. आम्हाला आपले प्रेम आणि आशीर्वादांची गरज आहे. आम्हाला माहित आहे की यावेळी देखील आम्ही विजेते होऊ. सकारात्मकतेचा प्रसार करण्यासाठी या वेळेचा सदुपयोग करा.

  • मान्यता 5 महिन्यांनंतर मंगळवारी मुंबईत परतली

संजयच्या आजारपणाबद्दल समजताच मान्यता मंगळवारी भारतात परतली. लॉकडाऊनपासून ती आपल्या दोन्ही मुलांसह दुबईत अडकली होती.

बातम्या आणखी आहेत...