आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नवा प्रोजेक्ट:शाहरुख खानच्या ‘क्लास ऑफ 83’ मध्ये झळकणार मराठमोळा पृथ्विक प्रताप, नेटफिल्क्सवर रिलीज होणार चित्रपट

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पृथ्विकने साकारलेली या सिनेमातील भूमिका ही फारच इंटरेस्टिंग आहे.

‘कहाणी पूरी फिल्मी हैं’ असं हलकं-फुलकं वाक्य म्हणणारी आणि वाक्याप्रमाणे वावरणारी, स्वत:मधील अभिनयाच्या टॅलेंटमुळे अनेकांची फेव्हरेट असणारी ही व्यक्ती किती फिल्मी असेल ना... ‘नाम में क्या हैं’, असं जरी म्हंटलं असलं तरी स्वत:च्या हिमतीवर, कौशल्यावर आणि मेहनतीने आणि ध्येयाने त्याने त्याचे नाव मोठे केले आहे आणि ही फिल्मी व्यक्ती मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहे. आणि त्या व्यक्तीचे नाव आहे ‘पृथ्विक प्रताप’.

अभिनयाची आवड असणा-या पृथ्विक प्रतापने मराठी मालिका, सिनेमा, नाटक, लघुपट, वेब सीरिज या माध्यमांत काम केले आहे. अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांत पृथ्विकने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ‘आंबट गोड’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘हम बने तुम बने’ या मराठी मालिकांचाही तो प्रमुख हिस्सा होता. इतकेच नव्ह तर सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा पर्व 2’ या कार्यक्रमात पृथ्विकने सहभाग घेतला होता आणि तो दुस-या पर्वाचा विजेता देखील ठरला. तसेच त्याने ‘नाईट स्कूल’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ या सिनेमांतही काम केले आहे. मालिका, सिनेमा, नाटक या तीन मंचावर प्रेक्षकांची मने जिंकत त्याने वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांचे आणखी मनोरंजन करण्यास सुरुवात केली. त्यात त्याने मराठीत ‘बॅक बेंचर्स’ आणि हिंदीत ‘लाखों में एक-2’ या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. 

आता लवकरच प्रेक्षकांना, पृथ्विक एका नवीन सिनेमात दिसणार आहे. नेटफिल्क्सवरील ब्रँड न्यू 17 सिनेमांची घोषणा अलीकडेच झाली असून या सिनेमांच्या यादीत पृथ्विकचा ही सिनेमा आहे ज्यामध्ये तो महत्त्वाची भूमिका साकारतोय आणि त्या सिनेमाचं नाव आहे ‘क्लास ऑफ 83’.

रेड चिलीझ् एंटरटेन्मेंट प्रॉडक्शन, अतुल सभरवाल दिग्दर्शित आणि शाहरुख खान, गौरी खान, गौरव वर्मा निर्मित ‘क्लास ऑफ 83’ या सिनेमात पृथ्विक महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात तो बॉबी देओल, अनुप सोनी, भूपेंद्र जाडावत, निनाद महाजनी, हितेश भोजराज आणि समीर परांजपे या दिग्गज कलाकारांसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

पृथ्विकने साकारलेली या सिनेमातील भूमिका ही फारच इंटरेस्टिंग आहे, पण त्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडीशी प्रतिक्षा करावी लागेल. पृथ्विकच्या अभिनय कौशल्यामुळे त्याची या सिनेमासाठी निवड करण्यात आली आहे.

0