आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सागर कारंडेला हार्ट अटॅक आला नव्हता:फेसबुक लाइव्ह येत सांगितले नेमके 'त्या' दिवशी काय घडले, म्हणाला - मी ठणठणीत आहे

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलाकारांचे आयुष्य अतिशय धकाधकीचे असते. शूटिंगच्या वेळा सांभाळत स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे अनेकदा त्यांना जमत नाही. त्याचाच परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होतो. असेच काहीसे घडले मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सागर कांरडे याच्याबाबतीत. सध्या सागर 'हीच तर फॅमिलीची गंमत आहे' या नाटकात काम करतोय.

20 नोव्हेंबर रोजी नाटक सुरू होण्याच्या काही तासआधी सागर कारंडेची तब्येत बिघडली. गिरगावातील साहित्य संघात संध्याकाळी 4.30 वाजता नाटकाचा प्रयोग होता आणि साधारण दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर सागरची प्रकृती ढासळली, त्याला हार्ट अटॅक आला, अशी त्याच्या प्रकृतीविषयी चुकीची माहिती पसरली होती. पण आता स्वतः सागरने फेसबुक लाइव्ह करत 20 नोव्हेंबर रोजी त्याला नेमके काय झाले होते, त्याचा उलगडा केला आहे.

मी ठणठणीत आहे
माझी तब्येत कशी आहे हेच सांगण्यासाठी मी लाइव्ह आलोय असे सागरने सांगितले. तो म्हणाला, 'काही चुकीच्या बातम्या पसरत आहेत, त्यामुळे खुलासा करण्यासाठी आलो आहे. रविवारी 20 नोव्हेंबरला आमच्या 'हीच तर फॅमिलीची गंमत आहे' या नाटकाचा प्रयोग होता. पण अचानक प्रयोगाआधी माझ्या छातीत दुखू लागले, मला चक्करही यायला लागलेली. साडेबारा-एकच्या दरम्यान ही घटना घडली. मग मी लगेच हॉस्पिटलला पोहोचलो, तिथून चेकअप केल्यानंतर प्रयोगाला जाण्याचे ठरवले. पण डॉक्टरांनी चक्कर येत असल्यामुळे आणि छातीत दुखत असल्याने प्रयोग करण्यास तसेच प्रवास करण्यास मनाई केली. त्यामुळे आमच्या 'हीच तर फॅमिलीची गंमत आहे' या नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला,' असे सागरने सांगितले.

विविध वैद्यकीय चाचण्या झाल्या

सागरने पुढे सांगितले की, यावेळी त्याला एक दिवस रुग्णालयात दाखल ठेवण्यात आले. ईसीजीसह विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या, ज्या सर्वांचे रिपोर्ट नॉर्मल आले. सर्व रिपोर्ट जरी नॉर्मल आले असले, तरी हा आठवडा माझ्यासाठी खूप धकाधकीचा होता, असे सागरने सांगितले. त्याने पुढे म्हणाला, 'गेला एक आठवडाभर मी सतत प्रवास करत होतो. रात्री शूटिंग आणि रिहर्सल सुरू होते. नाटकाचे प्रयोग सुरू होते, जेवण वेळेवर होत नव्हते. प्रयोगाच्या दिवशी सकाळी काही न खाल्ल्याने प्रचंड अॅसिडिटीही झाली, संपूर्ण शरीरात वेदना होत होत्या, त्यामुळे छातीतही वेदना सुरु झाल्या होत्या.' सोशल मीडियावर सागरला हार्ट अटॅक आल्याचे वृत्त पसरले आहे, हे साफ खोटे असल्याचे सागर यावेळी म्हणाला.

'वासूची सासू' नाटकाच्या टीमचे मानले आभार
सागरने या लाइव्हमध्ये 'वासूची सासू' या नाटकाच्या टीमचे आभार मानले. कारण 'हीच तर फॅमिलीची गंमत आहे' या नाटकाचा प्रयोग रद्द झाल्याने अगदी शेवटच्या क्षणी त्या वेळेत 'वासूची सासू' या नाटकाचा प्रयोग करण्याचे ठरले. खूप कमी वेळात या दुसऱ्या नाटकाच्या टीमने एकत्र येत नाटकाचा प्रयोग सादर केल्याने त्याने या टीमचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...