आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे काय बोलून गेला सुमीत राघवन:'तो' व्हिडिओ शेअर करत म्हणाला - 'आरे आंदोलक डोक्यावर चढले होते, बोगस फालतू लोक'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध अभिनेता सुमीत राघवनने गोरेगाव येथील आरे कारशेडवरुन वादग्रस्त ठरलेल्या मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला आहे. त्याने अनेकदा कारशेडला विरोध करणा-यांवर टीका केली आहे. नुकतेच त्याने यासंदर्भात एका ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने आरे कारशेड विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमींची खिल्ली उडवली आहे. त्यानंतर एका नेटकऱ्यामध्ये आणि सुमीत राघवनमध्ये चांगलेच ट्वीटर वॉर रंगले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
सुमीत राघवनने दोन दिवसांपूर्वी एक ट्वीट रिट्वीट केले होते. त्यात त्याने एक व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओत एक व्यक्ती आंदोलनकर्त्यांना मारताना दिसत आहे. या व्हिडिओला 'फ्रेंचचे काही नागरिक क्लायमेट चेंज अॅक्टिव्हिस्ट लोकांची काळजी घेताना' असे कॅप्शन दिले होते. सुमीतने या व्हिडिओ रिट्वीट करत असे काही लिहिले आहे की, त्यावरून नवा वाद निर्माण होऊ शकतो.

काय म्हणाला सुमीत?
“आरेच्या आंदोलकांबरोबर आपणही हेच करायला हवे होते. डोक्यावर चढले होते, बोगस फालतू लोक. काही कामाचे ना धामाचे”, असे म्हणत सुमीतने आरे आंदोलकांची खिल्ली उडवली.

यावरुन एका नेटकऱ्याने दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचे एक मीम शेअर केले आहे. या मीमवर ‘तू नट म्हणून भिकारडा आहेसच, पण तू माणूस म्हणून पण नीच आहेस’, असा एक डायलॉग लिहिला आहे.

तर आणखी एका नेटक-याने सुमीतला खडे बोल सुनावले आहेत. "हे ट्विट वाचून आपल्या मुस्काटात मारावी अशी इच्छा होत आहे" पण घटनेचा व कायद्याचा पाईक असल्याने मी तसे करणार नाही. बाकी आंदोलकांना लाथ मारण्यासाठी उत्तेजीत करणे चालू द्या," असे म्हटले आहे.

सुमीतच्या या ट्विटमुळे नव्या वादाला तोडं फुटण्याची शक्यता आहे. सुमीतने केलेल्या ट्विटनंतर अनेक नेटकऱ्यांनी आणि पर्यावरणप्रेमींनी त्याच्यावर टीका केली आहे.

बातम्या आणखी आहेत...