आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुपल नंद एका छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे. रुपल गेल्यावर्षी लग्नगाठीत अडकली. लग्नानंतर तिने अभिनयापासून छोटासा ब्रेक घेतला. आता ती ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यात रूपलची नवी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मोहिनी दुभाषी असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असणार आहे.
काय आहे भूमिका?
पोलिस आपल्या कामात नेहमी तत्पर असतात. दिवस-रात्र आपल्या कामाला महत्त्व देतात. आपल्या कुटुंबासाठी द्यायला पुरेसा वेळ त्यांच्याकडे नसतो. ते आपल्या कामाला नेहमी प्राधान्य देतात. अशाच प्रकारची विशिष्ट व्यक्तिरेखा या मालिकेतून आपल्याला पुन्हा भेटणार आहे, ती म्हणजे इन्स्पेक्टर भोसले. आपल्या कामात नेहमी तत्पर असणारे इन्स्पेक्टर विजय भोसले यांच्या आयुष्यातील दुसरी बाजू ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’! मालिकेतून उलगडणार आहे. अभिनेता हरीष दुधाडे इन्स्पेक्टर विजय भोसलेच्या भूमिकेत झळकणार आहे. तर रुपल त्याच्या होणाऱ्या पत्नीची भूमिका वठवणार आहे. याव्यतिरिक्त अश्विनी कासारही या मालिकेतून पोलिस निरीक्षकाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 1 मेपासून सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गेल्यावर्षी अडकली लग्नाच्या बेडीत
मुळची पुण्याची असलेली रुपल 'गोठ', 'श्रीमंताघरची सून' या मालिका आणि 'मुंबई पुणे मुंबई 3' या चित्रपटातून रुपल प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात रुपलने मुंबईच्या अनिश कानविंदे याच्यासोबत सप्तपदी घेतली. अभिनेत्री म्हणून टीव्हीवर येण्यापूर्वी रूपल डेंस्टिस्ट आहे. डॉक्टर असूनही अभिनयच्या आवडीने तिने या क्षेत्रात पदार्पण केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.