आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थडे पार्टी पडली महागात:रेव्ह पार्टीत अभिनेत्रीला अटक, जाणून घ्या कोण आहे हिना पांचाळ?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिग बॉस मराठी सीझन 2 मध्ये हिना पांचाळची वाइल्ड कार्ड एंट्री झाली होती.

आग्रा राष्ट्रीय महामार्गावर इगतपुरीमधील एका रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर नाशिक ग्रामीण पाेलिसांनी शनिवारी रात्री 2 वाजता छापा टाकला. काेराेना निर्बंधांचे काेणतेही नियम न पाळता आयाेजित या पार्टीत हिंदी तसेच तेलगू चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या चार महिला आणि तरुण सहभागी होते. त्यात बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री हिना पांचाळ व अझार फारनूद या विदेशी महिलेसह दोन कोरिअाेग्राफरचाही समावेश आहे. नायजेरियन ड्रग माफियाच्या सहकार्याने मुंबईमधील एका बड्या बुकीच्या वाढदिवसानिमित्त ही जंगी पार्टी देण्यात आली होती, हुक्का, कोकेन, हेरॉइनचा त्यात मुक्तहस्ते वापर सुरू हाेता.

कोण आहे हिना पांचाळ?
हिना पांचाळ हिने हिंदी, तामिळ आणि तेलगू फिल्म इंडस्ट्रीत अल्पवधीतच नाव कमावले आहे. हिना पांचाळ हिच्या नावावर जास्त चित्रपट नाहीत. मात्र, आयटम डान्सर म्हणून तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. ‍हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन सारख्या आयटम साँगमध्ये हिना थिरकताना दिसली. याशिवाय बलम बंबई आणि बेवडा बेवडा जालो मी टाइट या गाण्यांसाठी ती लोकप्रिय आहे.

2019 मध्ये बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वात हिना सहभागी झाली होती. मात्र अंतिम फेरीत ती धडक मारु शकली नव्हती. फेब्रुवारी 2020 मध्ये मुझसे शादी करोगे या डेटिंग रिअॅलिटी शोमध्येही ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

रेव्ह पार्टीत अटक झालेल्यांची नावे
याप्रकरणी पोलिसांनी 12 महिला आणि 10 पुरुष अशा 22 जणांना अटक केली आहे. पाठाेपाठ मुंबईतून पाेलिसांनी नायजेरियन ड्रग माफियालादेखील अटक केली. त्यांची चाैकशी रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शनिवारी रात्री छापा टाकला. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई येथील पीयूष नामक व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त इगतपुरीच्या स्काय ताज व्हिला येथे मुंबई व पुण्यातील 10 पुरुष व 12 महिलांची रेव्ह पार्टी आयाेजित करण्यात आली हाेती. 27 जूनला रात्री बारा वाजता वाढदिवसाचा केक कापण्यात आला.

या रेव्ह पार्टीत अटक झालेल्या लोकांमध्ये हिना पांचाळसह पीयूष शेट्टी, अमित लाट, आशीष लाट, राज त्रिवेदी, विशाल मेहता, नीरज सुराणा, रोहित अरोरा, हर्ष शहा, दानिश खान, अबू बकर, हनिफ शेख,सर्व राहणार, आरव शर्मा, विशाल मेहता, रोहित अरोरा, अकीब खान, वरुण बाफना, करिश्मा, चांदनी भठिजा, श्रुति शेट्टी, रुचिरा नार्वेकर, विदेशी महिला अजहर फरनुद, शनैया कौर, आशिता, शीना, प्रीति चौधरी, कौशिकी यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...