आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीनाला कोरोना:दोन लहान मुलं, तरी इतकं बिनधास्त कसे? महापौर किशोरी पेडणेकरांचा करीनावर संताप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली आहे. करीना आणि अमृता या दोघी जीवलग मैत्रिणी असून पार्टी गर्ल्स म्हणून त्यांना ओळखले जाते. या दोघीही कोरोनाच्या सुपर स्प्रेडर असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण या दोघींनीही गेल्या काही दिवसांत अनेक पार्ट्यांना हजेरी लावली होती. त्यावर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी करीनावर आपला संताप व्यक्त केला आहे.

महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "बॉलिवूडकरांनी नियम पाळायला हवेत. तसेच राजकीय लोकांनी देखील नियमांचे पालन करायला हवे. ग्रॅन्ड हयातमधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये नियम मोडले जात आहेत. बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. करीना कपूर आणि अमृता अरोरा सध्या होम क्वारंटाईन आहेत. दोघींवर पालिकेचे लक्ष असणार आहे. करीना कपूरला दोन लहान मुले आहेत, तरी इतकं बिनधास्त." असे पेडणेकर म्हणाल्या.

नियम पाळले पाहिजेत
पुढे किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ज्यांनी विचारले कोरोना कुठे आहे त्यांनादेखील कोरोनाची लागण झाली. बॉलिवूडमधील जबाबदार व्यक्तींनी जबाबदारीने वागले पाहिजे. माझे प्रामाणिक मत आहे की, आपले मुख्यमंत्री काटेकोर नियमांचे पालन करत आहेत तर राजकीय व्यक्तींनीदेखील नियम पाळले पाहिजेत.

बातम्या आणखी आहेत...