आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाते:ऋषीशी विवाह हा माझ्या जीवनातील आनंदी क्षण, मी त्यांची जिवाभावाची मैत्रीण, जोडीदारही होते - नीतू सिंग 

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऋषी आणि नीतू यांचे 12 चित्रपट होते.

ऋषी कपूर यांच्या खुल्लमखुल्ला आत्मचरित्राची प्रस्तावना पुत्र रणबीर व उत्तरार्ध पत्नी नीतू सिंगने लिहिला आहे. त्यांच्या शब्दांतील ऋषी कपूर...

नीतू सिंग म्हणतात... 

ऋषीसोबत राहण्यासाठी मी खूप त्याग केला, असे लोकांना वाटते. पण मी माझ्या पद्धतीनेच आयुष्य जगले, हेच खरे. मला काही त्याग करावा लागला नाही किंवा त्याची गरजही पडली नाही. ऋषी कपूरसोबत लग्न झाले हाच माझ्या आयुष्यातील आनंदाचा क्षण होता. त्यांचा स्वभाव तापट होता. त्यांना पटकन राग यायचा. स्पष्टवक्तेपणामुळे ते फटकन बोलून दाखवत. पण त्यांच्यासोबत मी व्यतीत केलेले क्षण फुलावर चालण्यासारखे होते. त्यांचा स्वभाव जिद्दी होता. 

चित्रपटांबाबत तीच जिद्द कायम असायची. कुटुंबावर त्यांचे खूप प्रेम होते. आम्ही विमानात बसलो आणि उतरल्यानंतर एकमेकांना ‘जय माता दी’ असा टेक्स्ट मेसेज करायचाच असा दंडक होता. जोपर्यंत हा मेसेज माझ्याकडून त्यांना मिळत नसे, तोपर्यंत ते बेचैन असायचे. बॉयफ्रेंड म्हणून ते जसे वागत त्याविरुद्ध त्यांचे पतीचे रूप असे. पडद्यावर आणि प्रत्यक्ष जीवनात मीच त्यांची खरी जोडीदार असेन आणि राहीनही.

  • 28 व्या वर्षी नीतूशी लग्न, 12 चित्रपटांत एकत्र काम केले

ऋषी कपूर यांनी 1980 मध्ये अभिनेत्री नीतू सिंगशी लग्न केले. दोघांनी 1973 - 1980 या काळात 12 चित्रपट केले. या जोडीला पसंती मिळाली. दोघांचे अनेक चित्रपट हिट राहिले.

बातम्या आणखी आहेत...