आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

71 वर्षांचे झाले मिथून दा:विवाहित असूनही मिथून दांनी श्रीदेवीसोबत केले होते दुसरे लग्न, पहिली पत्नी योगिता बालीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1988 मध्ये तुटले होते श्रीदेवीसोबतचे दुसरे लग्न

डिस्को डान्सर मिथून चक्रवर्ती यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 71 वर्षे पूर्ण केली आहेत. 16 जून, 1950 ला कोलकातामध्ये जन्मलेल्या मिथून दांचे खरे नाव गौरांग चक्रवर्ती आहे. हे नाव त्यांनी कधीच चित्रपटांसाठी वापरले नाही. मिथून बॉलिवूडमधील अशा व्यक्तींपैकी एक आहेत, ज्यांना कोणतेही फिल्मी बॅकग्राउंड नव्हते. इंडस्ट्रीमध्ये त्यांचा कुणी गॉड फादर नव्हता. त्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर या इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

खुप कमी लोकांना माहिती असेल की, मिथून चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी कट्टर नक्षली होते. कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपला मार्ग बदलला आणि आपल्या कुटुंबामध्ये परत आले. एका अपघातात त्यांच्या एकुलत्या एक भावाचा मृत्यू झाला होता. यानंतर मिथून दांनी स्वतःला नक्षली आंदोलनापासून दूर केले. त्यांनी चित्रपट करिअरची सुरुवात 1976 मध्ये आलेल्या 'मृगया' चित्रपटातून केली. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले.

यशस्वी अभिनेता झाल्यानंतर त्यांचे नाव त्यांच्या को-स्टार रंजीता, योगिता बाली, सारिका आणि इतर अभिनेत्रींसोबत जोडले गेले. परंतू त्यांच्या श्रीदेवीसोबतच्या अफेअरची चर्चा सर्वात जास्त रंगली. 1984 मध्ये 'जाग उठा इंसान' मध्ये श्रीदेवी आणि मिथून यांनी पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. मिथून दांनी एका मुलाखतीत स्वतः कबूल केले होते की, त्यांनी श्रीदेवीसोबत गुपचुप लग्न केले होते.

1988 मध्ये तुटले लग्न
रिपोर्ट्सनुसार, 1984 साली रिलीज झालेल्या 'जाग उठा इंसान' या चित्रपटाच्या शूटिंग सेटवर मिथून आणि श्रीदेवी यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. या दोघांनी गुपचुप लग्न उरकल्याचीही त्यावेळी जोरदार चर्चा रंगली होती. मिथून आणि श्रीदेवी यांचे लग्न तीन वर्षे टिकले. 1988 मध्ये दोघे वेगळे झाले होते. एका मॅगझिनने मिथून आणि श्रीदेवी यांचे मॅरेज सर्टिफिकेट प्रकाशित केल्यानंतर मिथून दांनी लग्नाची कबुली दिली होती. श्रीदेवी यांना मिथून विवाहित असल्याची कल्पना होती. पण मिथून चक्रवर्तींच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या श्रीदेवी यांनी याकडे दुर्लक्ष केले होते.

मिथून यांची बायको योगिता बालीने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, त्यांनाही मिथून-श्रीदेवीच्या लग्नाची माहिती होती. एका न्यूजपेपरने दोघांच्या लग्नाचे सर्टिफिकेट छापले होते. परंतू दोघांचे नाते जास्त दिवस टिकले नाही. यामागे मिथून यांची बायको योगिता या होत्या. योगिता यांनी मिथून यांना धमकी दिली होती की, श्रीदेवीसोबत संबंध ठेवले तर त्या आत्महत्या करतील. मिथून यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे.

मिथून यांच्यासोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतर श्रीदेवी यांनी 1996 मध्ये निर्माते बोनी कपूर यांच्याशी लग्न केले होते.

350 हून अधिक चित्रपटांमध्ये केले काम
आतापर्यंत त्यांनी 350 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे आणि आताही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी 'वारदात', 'अविनाश', 'जाल', 'डिस्को डांसर', 'भ्रष्टाचार', 'घर एक मंदिर', 'वतन के रखवाले', 'हमसे बढ़कर कौन', 'चरणों की सौगंध', 'हमसे है जमाना', 'बॉक्सर', 'बाजी', 'कसम पैदा करने वाले की', 'प्यार झुकता नहीं', 'करिश्मा कुदरत का', 'स्वर्ग से सुंदर' सारख्या चित्रपटात काम केले आहे. 1993 ते 1998 हा मिथून चक्रवर्ती यांच्या करिअरमधील सर्वात वाईट काळ होता. याकाळात त्यांचे चित्रपट एकामागोमाग फ्लॉप होत होते. या काळात त्यांचे लागोपाठ 33 चित्रपट फ्लॉप ठरले होते. तरीही त्यांचे स्टारडम टिकून होते. त्यावेळी त्यांना 12 चित्रपट साइन केले होते.

बातम्या आणखी आहेत...