आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉक्स ऑफिसवर त्सुनामी:कोरोनाच्या काळात पहिला बंपर ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला 'मास्टर', पहिल्या दिवशी वर्ल्डवाइड 40 कोटींहून अधिकचा जमवला गल्ला

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंदी व्हर्जन रिलीज, केवळ तामिळनाडूत झाली 23 कोटींहून अधिकची कमाई

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थालापती विजय आणि विजय सेतुपती स्टारर अ‍ॅक्शन-थ्रीलर फिल्म 'मास्टर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. रिपोर्ट्सनुसार पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरात 40 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. कोरोना काळातील हा पहिला चित्रपट आहे, ज्याला बंपर ओपनिंग मिळाली. लोकेश कानगराज दिग्दर्शित हा चित्रपट बुधवारी तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला. याचे हिंदी व्हर्जन गुरुवारी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे.

केवळ तामिळनाडूमध्ये 23 कोटींपेक्षा जास्त कमाई केली

बॉलिवूड लाइफने दिलेल्या माहितीनुसार, मास्टर या चित्रपटाने तामिळनाडूत 23 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. केरळ आणि कर्नाटकात चित्रपटाचा प्रत्येकी तीन तीन कोटींचा व्यवसाय झाला आहे.

तेलंगणा आणि आंध्र प्रदेश बेल्टमध्ये 'मास्टर'ने साडेचार कोटींपेक्षा जास्त कमाई केली. त्याचबरोबर उर्वरित देशात दीड कोटींहून अधिकचा व्यवसाय चित्रपटाने केला आहे. या सर्वाखेरीज या चित्रपटाने ओवरसीज मार्केटमध्ये 4 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला.

व्यापार विश्लेषकांनी म्हटले बॉक्स ऑफिसवरील त्सुनामी
मास्टरच्या ग्रॅण्ड रिलीजनंतर व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर लिहिले, "बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आली आहे. मास्टर या चित्रपटाची एक जबरदस्त सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांना जे पहायचे आहे ते तुम्ही द्या, प्रेक्षक कधीही तुम्हाला निराश करणआर नाहीत. मोठ्या पडद्यावर उत्कृष्ट कलाकृती बघणे कधीच थांबणार नाही.'

या चित्रपटात विजय आणि विजय सेतुपती यांच्याव्यतिरिक्त मालविका मोहनन, शांतनु भाग्यराज, अर्जुन दास आणि नसीर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दिग्दर्शक लोकेश कनागराज आणि सहलेखक रत्न कुमार यांनी या चित्रपटात स्पेशल अपिअरन्स दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...