आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थलापती विजयचा जलवा:कोरोना काळात 200 कोटी कमावणा-या 'मास्टर'चा हीरो विजय घेतो 100 कोटी फी, रजनीकांतलाही टाकले मागे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘मास्टर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

कोरोना काळात चित्रपटगृहात मास्टर हा चित्रपट रिलीज करुन बॉक्स ऑफिसवर किंग ठरलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार विजयचे नाव आज प्रत्येकाच्या ओठांवर आहे. व्यापार विश्लेषकांच्या मते, कोरोना काळात मास्टर हा भारताल पहिला असा चित्रपट आहे, ज्याला बंपर ओपनिंग मिळाली.

‘मास्टर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 70 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर या कमाईच्या आकडेवारीत वाढ झाली असून त्याने 200 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. यानिमित्ताने चित्रपटाचा नायक विजयविषयी काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात..

सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता

विजय हा सर्वाधिक मानधन घेणारा तामिळ अभिनेता आहे. त्याने आपल्या आगामी ‘थलापती 65’ या चित्रपटासाठी तब्बल 100 कोटींचे मानधन घेतले आहे. मानधनात त्याने रजनीकांत यांनाही मागे टाकले आहे. रजनीकांत यांनी ‘दरबार’ साठी 90 कोटी रुपये घेतले होते.

बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश

जोसेफ विजय चंद्रशेखर असे विजयचे खरे नाव आहे. तो थलापती म्हणून चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. विजयचे वडील एस.ए. चंद्रशेखर हे कॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. विजयने आपल्या वडिलांच्या 15 चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी सहा चित्रपटांमध्ये तो बाल कलाकार म्हणून झळकला.

विजय हा रजनीकांत यांचा मोठा चाहता आहे आणि 1985 साली आलेल्या नान सिवापु मनिथन या चित्रपटात बाल कलाकार म्हणून त्यांच्याबरोबर काम केले होते.

वयाच्या 18 व्या वर्षी विजयने नालैय्या थीरपू या चित्रपटाद्वारे तो लीड अॅक्टर म्हणून झळकला. या चित्रपटातील त्याचे नाव विजय होते. याच नावाने त्याने 8 चित्रपटांत काम केले आहे. 1992 मध्ये आलेला नालैय्या थीरपू हा चित्रपट जेमतेम ठरला. पण त्यानंतर विजयने एकामागून एक तीन हिट चित्रपट देऊन सर्वांची बोलती बंद केली. विजयने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत सुमारे 65 चित्रपटांत काम केले असून त्यापैकी बहुतेक बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले आहेत.

आपली आई शोभा चंद्रशेखर यांच्याप्रमाणेच विजय देखील एक उत्तम गायका आहे. थुपक्की या चित्रपटात त्याने गायलेले गूगल गूगल हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. या गाण्यासाठी विजयने सर्वाधिक लोकप्रिय तामिळ गाण्याचा पुरस्कारही आपल्या नावी केला होता.