आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्लॉकबस्टर 'मास्टर' आता OTT वर:कोरोना काळातील पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ‘या’ दिवशी 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होतोय रिलीज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तामिळ चित्रपटाने पहिल्याच दिवशी वर्ल्डवाइड 53 कोटींहून अधिकची कमाई केली होती.

दाक्षिणात्य सुपरस्टार थलापथी विजय आणि विजय सेतुपतीचा ‘मास्टर’ हा चित्रपट 13 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने तिकीटबारीवर तुफान कमाई केली. रिलीजच्या अवघ्या आठवड्याभरातच या चित्रपटाने 100 कोटींहून अधिकची कमाई केली होती. चित्रपटगृहानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. कोरोना काळात पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरलेला ‘मास्टर’ आता 29 जानेवारी रोजी अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.

तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या डिजिटल रिलीजबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, मास्टर हा चित्रपट 13 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट 29 जानेवारीला अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.

‘मास्टर’ या चित्रपटात अॅक्शनचा भरणा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराजने केले आहे. या चित्रपटात विजय सेतुपतिसोबतच मालविका मोहनन मुख्य भूमिकेत आहे.

'कबीर सिंग'च्या निर्मात्यांनी विकत घेतले हिंदी रिमेकचे हक्क
'कबीर सिंग' चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांनी ‘मास्टर’ चित्रपटाची लोकप्रियता पाहता चित्रपटाचे हक्क खरेदी केले आहेत. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, मुराद खेतानी काही आठवड्यांपूर्वी 'मास्टर' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी हैदराबदला गेले होते. त्यांना चित्रपट प्रचंड आवडला आणि त्यांनी चित्रपटाचे हक्क खरेदी केले आहेत. त्यासाठी त्यांनी सहा कोटी रुपये दिले असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटाच्या रिमेकसाठी बॉलिवूडमधील दोन कलाकारांची निवड करण्यात येणार असल्याचे म्हटले जाते. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.