आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • 'Mastram 2' Web Series Preparations Begin,shooting Will Kickstart After Three Month, Actor Said Caution Must Be Taken In Shooting Intimate Scenes

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आगामी:'मस्तराम 2'ची तयारी सुरू, तीन महिन्यांनंतर सुरु होणा-या शूटिंगविषयी अभिनेता म्हणाला - इंटिमेट सीन शूट करताना जास्त सावधगिरी बाळगावी लागेल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना विषाणूची परिस्थिती स्पष्ट झाल्यानंतर तीन महिन्यांनी इंटीमेट सीनचे लिखाण केले जाईल.

'मस्तराम' या वेब सीरिजला मिळालेले यश बघता आता निर्मात्यांनी याच्या दुस-या पर्वाची तयारी सुरु केली आहे. याच्या लेखकाने दुस-या सीझनसाठी कथा लिहिण्यास सुरुवात केली आहे. मात्र यावेळी कोविड 19 मुळे पहिल्या सीझनमध्ये जवढे इंटीमेट सीन्स होते, दुस-या सीझनमध्ये तेवढे नसतील. पहिल्या सीझन जिथे संपले होते, तेथून पुढे आता दुस-या सीझनची कहाणी सुरु होणार आहे. अभिनेता अंशुमन झा या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत असून त्याने राजाराम हे पात्र वठवले होते.   

  • शूटिंग तीन महिन्यांनंतर सुरू होईल

सीरिजचे लेखक आर्यन सुनील यांनी सांगितले, 'मस्तराम सीझन -2 मुख्यत: राजारामच्या पात्रावर केंद्रित असेल आणि सीझन 2 ची सुरूवात जिथून पहिला सीझन संपला तेथून होईल. येत्या तीन महिन्यांत कोरोना विषाणूची स्थिती काय असेल हे आम्हाला माहिती नाही, परंतु तीन महिन्यांनंतर आम्ही त्याचे शूट करण्याचा विचार करीत आहोत. सध्या मी इंटीमेट सीन वगळून स्टोरी लिहित आहे. कोरोना विषाणूची परिस्थिती स्पष्ट झाल्यानंतर तीन महिन्यांनी इंटीमेट सीनचे लिखाण केले जाईल. भविष्यात जशी परिस्थिती असेल  त्यानुसार इंटीमेट सीन्स असतील.' 

या सीरिजमध्ये मुख्य भूमिका करणारा अंशुमन झा म्हणतो, “मस्तराच्या यशानंतर आम्ही त्याचा सीझन 2 बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत. राजारामच्या लव्ह लाइफवर लक्ष केंद्रित केले जाईल, जे पहिल्या सीझनमध्येही दाखवले गेले आहे. माझे पात्र मस्तरामचे आहे, जो एरोटिक पुस्तके लिहितो आणि लोकांमध्ये ती खूप लोकप्रिय होतात. होय, पण आता मात्र इंटीमेट सीन्स शूट करताना मला जास्त सावधगिरी बाळगावी लागले. मी सेटपासून ते घरापर्यंत योग्य प्रोटोकॉलचे अनुसरण करेन, कारण यावेळी सुरक्षेला सर्वात जास्त प्राधान्य आहे.'

बातम्या आणखी आहेत...