आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘बिग बॉस 16’ शोचा विजयी ठरल्यापासून एमसी स्टॅन तुफान चर्चेत आहे. यातच एमसी स्टॅनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तो शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमसी स्टॅन 'जवान'च्या एका गाण्यात दिसणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानच्या आगामी 'जवान' चित्रपटात एमसी स्टॅन दिसणार आहे. चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण महाराष्ट्रात झाले आहे. रिपोर्टनुसार या चित्रपटात पुणे मेट्रो देखील दाखवण्यात आली आहे. 'जवान'चे संगीतकार अनिरुद्ध रविचंदर एमसी स्टॅनचा आवाज चित्रपटातील कोणत्याही गाण्यात समाविष्ट करू शकतात.
एमसी स्टॅन एक हिंदी रॅपर आहे. युट्युबवरचे त्याचे रॅप सॉन्ग प्रचंड लोकप्रिय आहेत. एमसी स्टॅनच नक्की खरं नाव हे अल्ताफ तडवी आहे. त्याला अगदी लहान असल्यापासूनच रॅपिंगचे वेड लागले होते. हळूहळू तो स्वतःच रॅप सॉंग लिहायला लागला होता. ‘समझ मेरी बात को’ या गाण्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या गाण्यात त्याने DIVINE आणि EMIWAY सारख्या रॅपर्सचा उल्लेख करत त्यांना रोस्ट केलं होतं. त्याचं गाणं व्हायरल झालं आणि स्टॅन लोकप्रिय झाला.
सध्या एमसी स्टॅन हा लाखो रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे एमसी स्टॅनचे लहानपण मोठ्या कष्टात गेले आहे. खाण्यासाठीही पैसे नव्हते. बऱ्याचदा रस्त्यावरही झोपायला लागायचे असं त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. एमसी स्टॅनचे वडील हे रेल्वेमध्ये हवालदार पदावर कार्यरत असून आई गृहिणी आहे. सध्या हे संपूर्ण कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झालेले आहे.
साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती आणि अभिनेत्री नयनतारा देखील 'जवान' मध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट यावर्षी 2 जूनला रिलीज होणार आहे. अल्लू अर्जुन देखील शाहरुख खानच्या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसू शकतो. मात्र, नवीन रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनने कॅमिओ करण्यास नकार दिला आहे. 'पुष्पा 2'च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे त्याने ही ऑफर नाकारली आहे.
'बिग बॉस' विनर MC स्टॅनला लागले लग्नाचे वेध
'बिग बॉस 16'चा विजेता आणि रॅपर एमसी स्टॅनला आता लग्नाचे वेध लागले आहेत. बूबा असे स्टॅनच्या गर्लफ्रेंडचे नाव असून ‘बिग बॉस’च्या घरामध्ये तो बऱ्याचदा बूबाबाबत बोलताना दिसला. आता तर त्याने त्याच्या लग्नाबाबत भाष्य केले आहे. लवकरच बूबासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याचे तो अलीकडेच म्हणाला. शिवाय बिग बॉसच्या घरात जेव्हा स्टॅनची आई त्याला भेटायला आली होती, तेव्हा स्टॅन लवकरच बूबासोबत लग्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आता बुबा कोण आहे? याविषयी जाणून घेण्यास त्याचे चाहते उत्सुक आहेत. येथे वाचा संपुर्ण बातमी.
भारताचा दौरा करणार रॅपर एमसी स्टॅन
‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर एमसी स्टॅनची लोकप्रियता आणखी वाढली. आता रॅपर एमसी स्टेन भारताच्या दौऱ्यावर जाणार आहे. साडेचार महिने चाललेल्या बिग बॉस १६ दरम्यान, एमसीला त्याचा कोणताही शो करता आला नाही. मार्च ते मे, असे सलग तीन महिने वेगवेगळ्या शहरांमध्ये त्याचे शो करण्यासाठी तो रवाना होणार आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.