आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘बिग बॉस 16’ चा विजेता एमसी स्टॅनने आपल्या चाहत्यांसाठी संपूर्ण देशभरात त्याचे कॉन्सर्ट आयोजित केले आहेत. त्याच्या कॉन्सर्टलाही चाहते गर्दी करत आहेत. मात्र 17 मार्च रोजी इंदूरमध्ये झालेल्या त्याच्या कॉन्सर्टमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. कॉन्सर्टदरम्यान बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत ते बंद पाडल्याचे समोर आले आहे. या वृत्तानंतर एमसी स्टॅनच्या चाहत्यांमध्ये संताप पाहायला मिळतोय. या प्रकारानंतर स्टॅनच्या चाहत्यांनी त्याला पाठिंबा दर्शविला आहे. त्याच्या समर्थनार्थ ट्वीटरवर PUBLIC STANDS WITH MC STAN हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला आहे. जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण?
'बिग बॉस'चा विजेता ठरल्यानंतर एमसी स्टॅन देशातील विविध शहरांमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट करत आहे. 17 मार्च रोजी त्याचा इंदौर येथे लाइव्ह कॉन्सर्ट होता. मात्र एमसी स्टॅनच्या गाण्यावर बजरंग दलने आक्षेप घेतला आहे. रॅपमधून शिवीगाळ आणि महिलांबाबत करत असलेल्या वक्तव्याला बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. स्टॅन त्याच्या गाण्यांमधून ड्रग्जसारख्या गोष्टींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही बजरंग दलने केला आहे. त्यामुळे देशातील तरुण पिढी वाईट मार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
स्टॅनच्या इंदूर येथील कॉन्सर्टमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये बजरंग दलचे कार्यकर्ते स्टॅनच्या कॉन्सर्टदरम्यान स्टेजवर जाऊन बोलताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ...
एमसी स्टॅनच्या चाहते ट्वीटरवर त्याला पाठिंबा दर्शवत आहेत. बजरंग दलाचे कार्यकर्ते मंचापर्यंत कसे आले, रक्षकांनी त्यांना अडवले कसे नाही, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.
इंदूरनंतर स्टॅनचे शनिवारी (18 मार्च) नागपूरमध्ये आणि 19 मार्चला पुण्यात कॉन्सर्ट होणार आहे. त्यानंतर 28 एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. 29 एप्रिल रोजी जयपूर, 6 मे रोजी कोलकाता आणि 7 मे रोजी दिल्लीत स्टॅनचे लाइव्ह कॉन्सर्ट होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.