आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Meejan Jafri Used To Tie The Shoelaces Of Junior Artist On Set Of 'Gangubai Kathiawadi', Said Many People On The Set Were Shocked To See Me In This Role

अभिनेता बनला असिस्टंट डायरेक्टर:'गंगूबाई काठियावाडी'च्या सेठवर ज्युनिअर आर्टिस्टटचे शूलेस बांधायचा मीजान जाफरी, म्हणाला - सेटवर मला या भूमिकेत बघून लोक आश्चर्यचकित झाले होते

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मीजानला या भूमिकेत पाहून सेटवरील अनेक लोकांना धक्का बसला होता

बॉलिवूड अभिनेता मीजान जाफरीने अलीकडेच संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाच्या सेटवर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. मीजानने एका मुलाखतीत सांगितले की, या चित्रपटाचा एक असिस्टंट डायरेक्टर आजारी पडल्यानंतर त्याने चित्रपटाच्या सेटवर सहाय्यक म्हणून काम केले होते. त्याचबरोबर सेटवर आलिया भट्ट आणि अजय देवगणकडून खूप काही शिकायला मिळाले, असेही तो म्हणाला.

मीजानला या भूमिकेत पाहून सेटवरील अनेक लोकांना धक्का बसला होता मीजान म्हणाला, "सेटवर बरेच लोक मला या भूमिकेत पाहून आश्चर्यचकित झाले, कारण एकदा तुम्ही अभिनेता झालात की तुम्ही या गोष्टी करत नाही. सेटवर एक किंवा दोन दिवसांसाठी असिस्ट करणे, क्लॅप हातात धरणे, धावपळ करणे, ज्युनिअर कलाकारांना एकत्र करणे, अशी बरीच कामे सेटवर करावी लागतात. संजय सरांच्या सेटवर सुमारे 300 ज्युनिअर आर्टिस्ट होते. प्रत्येकजण माझ्याजवळ येऊन 'तुम्ही हे कसे करत आहात', असा प्रश्न विचारत होता. आपण या कामांना छोटे का समजतो? हे मला समजत नाही. माझ्या मते भविष्यात या गोष्टी तुम्हाला आधार देतात. तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतात. तुम्ही त्यांच्याबरोबर ग्रो होता आणि तुम्हाला शिकण्यास देखील मदत करतात," असे मीजान सांगतो.

मीजानने सेटवर ज्युनियर आर्टिस्टचे शूलेस बांधण्याचे कामदेखील केले
मीजान पुढे सांगतो, "मी सेटवर धावपळ करायचो, ज्युनिअर आर्टिस्टचे शूलेस बांधायचो, त्यांना चप्पल घालायला मदत करायचो, मी सेटवर ती सर्व कामे केली जी करावी लागतात. मला फिल्ममेकिंगची प्रोसेस आवडते."

शेवटचा 'हंगामा 2' मध्ये दिसला होता मीजान

वर्क फ्रंट बद्दल सांगायचे झाल्यास मीजान अखेरचा प्रियदर्शन यांच्या 'हंगामा 2'मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासह शिल्पा शेट्टी, परेश रावल, राजपाल यादव, प्रणिता सुभाष झळकले होते. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

बातम्या आणखी आहेत...