आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे आहे बॉलिवूडची 'दामिनी':26 वर्षांपासून बॉलिवू़डपासून लांब असलेल्या मीनाक्षी शेषाद्रीचा एवढा बदलला लूक, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले हैराण

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या नो मेकअप फोटोमध्ये मीनाक्षी शॉर्ट हेअरस्टाईलमध्ये दिसत आहे

'दामिनी' या सुपरहिट चित्रपटात ऋषी कपूरसोबत अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट मीनाक्षीच्या करिअरसाठी मैलाचा दगड ठरला. 'दामिनी'सह अनेक हिट चित्रपटांत काम करणारी मिनाक्षी अचानक फिल्मी दुनियेतून गायब झाली होती.

चित्रपटसृष्टीपासून मीनाक्षी दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय आहे आणि तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक अपडेट्स इथे शेअर करत असते. अलीकडेच मीनाक्षीने ट्विटरवर तिच्या नवीन लूकचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिला क्षणभर ओळखणे कठीण झाले.

या नो मेकअप फोटोमध्ये मीनाक्षी शॉर्ट हेअरस्टाईलमध्ये दिसत आहे. तिने चष्मा लावला आहे. तिचा हा लूक पाहून मीनाक्षीचे चाहते हैराण झाले आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, या तुम्हीच आहात का? दुसऱ्या यूजरने लिहिले, तुम्ही स्वतःची काय अवस्था करुन घेतली आहे?

वयाच्या 17 व्या वर्षी मिस इंडियाचा किताब केला होता नावी

16 नोव्हेंबर 1963 रोजी (सिंदरी, झारखंड) मध्ये तामिळ कुटुंबात जन्मलेल्या मिनाक्षीने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केली. ‘पेंटर बाबू’ (1983) हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता. पण तिला खरी ओळख मिळाली ती ‘हीरो’ या चित्रपटातून. हा ब्लॉकबस्टर चित्रपट होता. यामध्ये जॅकी श्रॉफ तिचे हीरो होते.

घातक होता शेवटचा चित्रपट

आपल्या फिल्मी करिअरमध्ये मिनाक्षीने ‘मेरी जंग’, ‘घर हो तो ऐसा’, ‘घायल’, ‘दामिनी’ आणि ‘घातक’ हे गाजलेले चित्रपट दिले. 1996 साली रिलीज झालेल्या 'घातक' या चित्रपटात ती शेवटची झळकली होती. त्यानंतर ती पेज थ्री पार्टीजमध्येही कधी दिसली नाही. अभिनेत्रीसोबत मिनाक्षी एक उत्कृष्ट क्लासिकल डान्सरसुद्धा आहे. ती चार नृत्यप्रकारात पारंगत आहे. भरतनाट्यम, कुचिपुडी, कथ्थक आणि ओडिसी नृत्य प्रकार ती शिकली आहे. तिने वेम्पति चिन्ना सत्यम आणि जय रामाराव यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवले. आपल्या फिल्मी करिअरमध्ये तिने अनेक मोठ्या दिग्दर्शक-निर्मात्यासोबत काम केले आहे. अमिताभ बच्चनपासून ते विनोद खन्ना, ऋषी कपूर, अनिल कपूर हे मोठे फिल्म स्टार्स तिचे हीरो होते.

हे होते फिल्मी करिअर सोडण्यामागचे कारण
असे म्हटले जाते, की फिल्ममेकर राजकुमार संतोषी त्यांच्या प्रत्येक चित्रपटात मिनाक्षीला हीरोईन म्हणून कास्ट करायचे. एकेदिवशी संतोषी यांनी मिनाक्षीकडे त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. पण मिनाक्षीने त्यांचे प्रेम नाकारले. इतकेच नाही तर त्याचवेळी तिने बॉलिवूडलाही अलविदा केले आणि ती परदेशी निघून गेली.

इन्व्हेस्टमेंट बँकरसोबत केले लग्न
मिनाक्षीने 1995 साली इन्व्हेस्टमेंट बँकर हरीश मैसूरसोबत लग्न केले आणि अमेरिकेतील प्लानो (टेक्सास) मध्ये स्थायिक झाली. दोघांनी न्यूयॉर्कमध्ये रजिस्टर्ड मॅरेज केले होते. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचे नाव केंद्रा तर मुलाचे नाव जोश आहे. लग्नानंतर मिनाक्षी सिनेसृष्टीपासून कायमची दुरावली.

आता डान्स अकॅडमी चालवते मिनाक्षी
चित्रपटसृष्टीपासून दुरावल्यानंतर मिनाक्षीने नृत्याची आवड जोपासली. टेक्सासमध्ये तिने Cherish Dance School नावाने डान्स अकॅडमी सुरु केली. टेक्सासमधील भारतीयांमध्ये मिनाक्षी लोकप्रिय आहे.

कुमार सानूचे होते मिनाक्षीवर एकतर्फी प्रेम
गायक कुमार सानू मिनाक्षीच्या प्रेमात पडले होते. पण हे प्रेम एकतर्फी होते. 'जुर्म' या चित्रपटातील 'जब कोई बात बिगड़ जाए..' हे गाणे कुमार सानूने गायले होते. या चित्रपटाच्या प्रीमिअर शोला मिनाक्षीसोबत कुमार सानूची भेट झाली होती. मिनाक्षीला बघताच क्षणी ते तिच्या प्रेमात पडले होते. पण हे नाते पुढे जाऊ शकले नाही.

या प्रमुख सिनेमांमध्ये झळकली मिनाक्षी

हीरो (1983), आवारा बाप (1985), बेवफाई (1985), मेरी जंग (1985), अल्ला रक्खा (1986), डकैत (1987), गंगा जमुना सरस्वती (1988), शंहशाह (1988), जोशीले (1989), जुर्म (1990), आज का गुंडाराज (1992), क्षत्रिय (1993), दामिनी (1993), घातक (1996).

तेलुगू आणि तामिळ चित्रपटांमध्ये केल काम
1989 साली मिनाक्षीने 'मिस्टर इंडिया'चा या हिंदी चित्रपटाचा रिमेक असलेल्या En Rathathin Rathame (1989) मध्ये काम केले. याशिवाय ती 'ब्रम्हर्षि विश्वामित्र' आणि 'आपद बंधावुडु' या तेलुगू चित्रपटांमध्येही झळकली.

बातम्या आणखी आहेत...