आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीना कुमारीच्या 'पाकीजा'चा पाकिस्तानमध्ये बनणार रिमेक:माहिरा खान नव्हे मीरा साकारणार मुख्य भूमिका, 13 वर्षांपासून सुरू आहे चित्रपटावर काम

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीत लवकरच भारतीय सिनेमाचा क्लासिक चित्रपट 'पाकीजा'चा रिमेक बनणार आहे. या रिमेकमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री मीरा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. खुद्द मीराने एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.

'पाकिजा' हा दिवंगत अभिनेत्री मीना कुमारी यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते त्यांचे पती कमाल अमरोही हे होते. या चित्रपटात मीना कुमारी यांच्यासह अशोक कुमार आणि राजकुमार मुख्य भूमिकेत होते.

'पाकिजा'मध्ये मी मुख्य भूमिका साकारणार आहे - मीरा
समा डिजिटल टुडेशी संवाद साधताना मीरा म्हणाली – मी पाकीजामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. आम्ही जवळपास 13 वर्षांपासून या प्रोजेक्टवर काम करत आहोत. अखेर मार्चपासून आम्ही त्याचे शूटिंग सुरू करणार आहोत.

कास्टिंगचे काम अजूनही सुरू आहे- मीरा
मीरा पुढे म्हणाली की, या चित्रपटाची निर्मिती यूएस स्थित प्रोडक्शन रेड लिपस्टिक करणार आहे. कास्टिंगचे काम अजूनही सुरू आहे. यापूर्वी, या चित्रपटात माहिरा खान मुख्य भूमिकेत असेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र मीराने या वृत्ताचे खंडन करत तीच या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असल्याचे स्पष्ट केले आहे.

'पाकीजा' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट म्युझिकल ड्रामा आहे
रिलीजच्या अनेक वर्षांनंतरही 'पाकिजा' हा भारतीय सिनेमातील सर्वात सुंदर म्युझिकल ड्रामापैकी एक मानला जातो. 'पाकिजा' हा चित्रपट तयार व्हायला खूप वर्षे लागली होती. 1956 मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. पण काम अर्धवटच थांबले होते.

सुरुवातीला 'पाकीजा' बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.
1969 मध्ये चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यात आले, पण तोपर्यंत मीना यांची तब्येत खूपच खालावली होती. शेवटी 1972 मध्ये हा चित्रपट पूर्ण झाला आणि बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला.

चित्रपट सुरुवातीला फारशी कमाल दाखवू शकला नाही. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर तीन दिवसांनीच मीना कुमारी यांचे निधन झाले होते. यानंतर त्यांच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये गर्दी केली आणि हा चित्रपट सुपरहिट झाला.

बातम्या आणखी आहेत...