आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तौक्तेचा तडाखा:तौक्ते चक्रीवादळामुळे अमिताभ बच्चन यांचे ऑफिस 'जनक'चे मोठे नुकसान, पूरसदृष्य परिस्थिती; कर्मचा-यांच्या घरावरील छप्पर उडाले

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही माहिती स्वतः बिग बी यांनी आपल्या ब्लॉगद्वारे दिली आहे.

अरबी समुद्रात उठलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या समुद्रकिनाऱ्याजवळील शहरांध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाचा फटका बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनाही बसला आहे. या चक्रीवादळामुळे त्यांच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. ही माहिती स्वतः बिग बी यांनी आपल्या ब्लॉगद्वारे दिली आहे.

अमिताभ यांनी सांगितले की, सोमवारी रात्री त्यांचे ऑफिस 'जनक'मध्ये पाणी साचले आणि सोबतच त्यांच्या कर्मचा-यांसाठी बांधण्यात आलेल्या घरांवरील छप्पर उडाले. यावेळी मदतकार्यात पाण्यात भिजलेल्या स्टाफ मेंबर्सना स्वतःचे कपडे दिल्याचे त्यांनी सांगितले.

अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिले, "चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भीषण शांतता आहे. दिवसभर जोरदार वारा आणि जोरदार पाऊस... झाडे पडली, सर्वत्र पाणी साचले, संवेदनशील 'जनक' ऑफिसमध्ये पूर. पावसाळ्यासाठी लावण्यात आलेले प्लास्टिक कव्हर शीटदेखील फाटल्या. शेड्स तुटले, आणि काही कर्मचा-यांसाठी ऑफिसच्या परिसरात बांधण्यात आलेल्या घरांचे छप्परही उडून गेले. सर्वजण एकमेकांना मदत करत आहेत. या परिस्थितीतही दुरुस्तीचे काम चालू आहे," असे बिग बींनी सांगितले.

प्रत्येकजण सुरक्षित रहावे यासाठी प्रार्थना करा
अमिताभ बच्चन पुढे म्हणाले, "अशा परिस्थितीत कर्मचारी अद्भूत आहेत. त्यांचे यूनिफॉर्म पूर्ण भिजले तरी देखील त्यांनी काम सुरु ठेवले. या संघर्षात मी त्यांना माझे कपडे दिले, कारण दुरुस्तीचे काम करताना ते पूर्णपणे भिजले होते. माझ्या चाहत्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो." अमिताभ यांनी सोशल मीडियावरदेखील एक पोस्ट लिहिली. "तौक्ते चक्रीवादळाने बरेच नुकसान केले आहे. प्रत्येकजण सुरक्षित राहो यासाठी प्रार्थना करतो," असे बिग बी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...