आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गॉडफादर'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज:जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसले चिरंजीवी- सलमान

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलुगू सिनेसृष्टीचे सुपरस्टार चिंरजीवी आणि बॉलिवूडचा दबंग खान अर्थातच सलमान खानच्या बहुचर्चित 'गॉडफादर' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये चिरंजीवी आणि सलमान यांची जबरदस्त अ‍ॅक्शन लक्ष वेधून घेतेय. ट्रेलरमध्ये चिरंजीवी ब्रह्माच्या दमदार भूमिकेत दिसत आहेत. मात्र राजकारणात त्यांचे बरेच विरोधक असल्याचंही पाहायला मिळत आहे. चिरंजीवी त्यांच्या या विरोधकांशी पूर्ण ताकदीने लढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या ट्रेलरमध्ये चिरंजीवी सलमानच्या मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याचे दिसते.

चिरंजीवी आणि सलमानव्यतिरिक्त लेडी सुपरस्टार नयनतारा, सुनील वर्मा आणि सत्य देव यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत. 'गॉडफादर' हा चित्रपट 'ल्यूसिफर' या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मोहन राजा यांनी केलं आहे. रिपोर्ट्सनुसार चिरंजीवी यांच्या या चित्रपटासाठी सलमान खानने कोणतंही मानधन घेतलेलं नाही. हा चित्रपट येत्या 5 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तो लवकरच 'टायगर 3'मध्ये कतरिना कैफसोबत दिसणार आहे. याशिवाय शाहरुख खान स्टारर 'पठाण'मध्ये तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय आता तो बिग बॉसच्या 16 व्या सीझनच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

बातम्या आणखी आहेत...