आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेगास्टार चिरंजीवीच्या अडचणीत वाढ:कोणताही वितरक मेगास्टारचा चित्रपट 'गॉडफादर' विकत घेण्यास तयार नाही

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिरंजीवी लवकरच गॉडफादर या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 5 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र, सध्याची परिस्थिती पाहता चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले जाईल असे दिसते. याचे कारण चित्रपटाला अद्याप वितरक मिळालेले नाहीत.

वितरक लवकर न मिळाल्यास चित्रपट पुढे ढकलला जाईल
हा चित्रपट रिलीज होण्यास अवघे ३ आठवडे उरले असून, कोणताही वितरक तो प्रदर्शित करण्यास तयार नाही. मेगास्टार आणि त्याच्या चित्रपटासाठी हे धोक्याचे चिन्ह आहे. साऊथचा मेगास्टार चिरंजीवीच्या 40 वर्षांच्या शानदार कारकिर्दीतील ही पहिलीच वेळ आहे जेव्हा त्याचा चित्रपट वितरक शोधण्यासाठी धडपडत आहे.

एका फ्लॉप चित्रपटामुळे चिरंजीवीचा ट्रॅक रेकॉर्ड उद्ध्वस्त झाला
ट्रेक टॉलीवूडमधील एका रिपोर्टनुसार, गॉडफादरला वितरक न मिळण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे चिरंजीवीचा मागील चित्रपट 'आचार्य' बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरणे. 29 एप्रिल 2022 रोजी रिलीज झालेला आचार्य हा चित्रपट 140 कोटी रुपयांच्या मेगा बजेटमध्ये तयार करण्यात आला होता, त्याने केवळ 74 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. या चित्रपटाचे निर्माते आणि वितरक दोघांनाही मोठे नुकसान सहन करावे लागले. निर्मात्यांना तोट्यापासून वाचवण्यासाठी चिरंजीवींनी त्यांची अर्धी फीही परत केली होती, पण त्यामुळेही तोटा भरून निघू शकला नाही.

चित्रपटासाठी वितरक का आवश्यक आहेत?
निर्माते पैसे गुंतवून कोणताही चित्रपट तयार करतात. चित्रपट तयार झाल्यानंतर तो वितरकांना विकला जातो आणि वितरक चित्रपटाला चित्रपटगृहात घेऊन जातात. निर्मात्यांशिवाय दिग्दर्शक त्यांचे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करू शकत नाहीत. चित्रपट फ्लॉप झाला तर सर्वात जास्त तोटा वितरकांना होतो कारण चित्रपटाची किंमत आधीच निर्मात्याला दिली जाते.

बातम्या आणखी आहेत...