आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'मेहंदी' आणि 'फरेब' या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता फराज खान बंगळुरूच्या विक्रम हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल आहे. फराजच्या उपचारांसाठी त्याच्या कुटुंबीयांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. अभिनेत्री पूजा भट्ट हिने ट्विटरवर ही माहिती शेअर करताना लिहिले की, “कृपया शेअर करा आणि शक्य असेल तर योगदान द्या.”
Please share and contribute if possible. I am. Would be grateful if any of you can as well. 🙏https://t.co/UZSbvA2sZb
— Pooja Bhatt (@PoojaB1972) October 14, 2020
फराजचे नातेवाईक फहाद अबाउशर आणि अहमद शमून यांनी फंड-राइजर वेबसाइटद्वारे लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. त्यांनी लिहिले - माझा प्रिय भाऊ, मित्र आणि प्रिय कलाकार आज जीवन-मृत्यूशी संघर्ष करतोय. त्याने आपली बरीच वर्षे कलाविश्वाला दिली आहेत आणि कॅमेरासमोर सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला आहे. पण आज त्याला जगण्यासाठी मदतीची गरज आहे. कृपया फराजच्या उपचारांसाठी शक्य तितकी मदत करा.
छातीतील संसर्ग मेंदूत पोहोचला
पोस्टमध्ये पुढे लिहिले, फराजला मागील एक वर्षापासून खोकला आणि छातीत संसर्ग झाला होता. अलीकडे, जेव्हा त्याचा खोकला अचानक वाढला तेव्हा त्याने व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टरांचा सल्ला घेतला. 8 ऑक्टोबर रोजी जेव्हा डॉक्टरांनी त्याची प्रकृती पाहिली तेव्हा त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. यानंतर आम्ही रुग्णवाहिका बोलविली.
तथापि, नंतर जे घडले ते आम्हाला हादरवून टाकणारे होते. रुग्णवाहिका वाटेत असताना फराजला झटका आला आणि तो अचानक अनियंत्रित होऊन हलू लागला. जेव्हा रूग्णवाहिका घरी पोहोचली आणि त्याला स्ट्रेचरवर ठेवण्यात आले, तेव्हा पुन्हा त्याला झटका आला.
यानंतर विक्रम हॉस्पिटलकडे जाताना वाटेत त्याला तिसरा झटका आला. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला कळले की छातीमधील इन्फेक्शन त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचले आहे आणि त्यामुळे त्याला एकामागून एक झटके आले.
उपचारांसाठी 25 लाख रुपयांची गरज
पोस्टनुसार, डॉक्टरांनी फराजला 7-10 दिवस क्रिटिकल यूनिटमध्ये ठेवण्यास सांगितले आहे, ज्यासाठी सुमारे 25 लाख रुपये खर्च येईल. फराज यांनी बर्याच वर्षांपासून चित्रपटात काम केले नाही. त्याच्यासाठी 25 लाख रुपये ही मोठी रक्कम आहे.
कुटुंबातील सदस्यांनी लिहिले आहे - डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, फराज बरा होऊन आपले सामान्य जीवन जगू शकेल. परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्याला आयसीयूमध्ये आवश्यक उपचार दिल्यानंतर वैद्यकीय सेवा दिली जाईल.
चरित्र अभिनेते युसूफ खान यांचा मुलगा आहे फराज
फराज खान हा चरित्र अभिनेते युसुफ खान ('अमर अकबर अँथनी' फेम जेबिसको) यांचा मुलगा आहे. राणी मुखर्जी स्टारर 'मेहंदी' (1998) मध्ये फराजने मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय त्याने 'फरेब' (1996), 'पृथ्वी' (1997) आणि 'दिल ने फिर याद किया' (2001) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.