आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नवा चित्रपट:शहरी आणि ग्रामीण भागातील वास्तव परिस्थितीवर भाष्य करणारा 'मेरे देश की धरती' लवकरच येणार भेटीला

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटात शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही जीवनावर भाष्य करण्यात आले आहे.

कोरोनाचे संकट हळूहळू दूर होत असताना सिनेक्षेत्रही रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. कार्निवल ग्रुपची निर्मिती असलेला 'मेरे देश की धरती' हा नवाकोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कार्निवल मोशन पिक्चर्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर काही दिवसांपूर्वी 'मेरे देश की धरती'चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. दिव्यांदू शर्मा, अनंत विधात आणि अनुप्रिया गोएंका या कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या 'मेरे देश की धरती' या चित्रपटाचं दिग्दर्शन फराज हैदर यांनी केलं आहे. याशिवाय ईंनाम्युलहक, ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर यांच्यासह इतर कलाकारांनीही या चित्रपटात अभिनय केला आहे.

'मेरे देश की धरती' या चित्रपटाच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील वास्तव परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. दोन इंजिनिअर्स आणि त्यांच्या बदलत जाणाऱ्या जीवन प्रवासाचे लक्षवेधी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. जनमानसापर्यंत एक महत्त्वपूर्ण संदेश पोहोचवणारा हा चित्रपट एक ‘पेट्रियोटिक ड्रामा’ आहे. पोस्ट प्रॉडक्शन्ससह चित्रपटाच्या इतर तांत्रिक बाबींचे काम पूर्ण झाले असून, लवकरच चित्रपट रसिक दरबारी हजेरी लावणार आहे. भोपाळमधील सेहोर जिल्ह्यासह मुंबई आणि आसपासच्या भागात चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे.