आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेट गाला 2021:व्हर्च्युअली नव्हे तर पहिल्यासारखाच होणार ता-यांचा हा सोहळा, जाणून घ्या कधी होणार आहे हॉलिवूडचा हा सर्वात मोठा इव्हेंट

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड सेलिब्रिटी या सोहळ्यात सहभागी होत असतात. - Divya Marathi
बॉलिवूड सेलिब्रिटी या सोहळ्यात सहभागी होत असतात.
  • 2 भागात होणार हा महोत्सव

कोरोनामुळे मागील वर्षी हा सोहळा रद्द करण्यात आला होता, मात्र यंदा हा इव्हेंट होणार आहे. हॉलिवूडचा सर्वात मोठा इव्हेंट मेट गाला अखेर कधी होणार यावरुन पडदा उचलण्यात आला आहे. न्यूयॉर्क शहरात मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट कॉश्च्यूम इन्स्टिट्यूटमध्ये दरवर्षी होणाऱ्या मेट गाला कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा रद्द करण्यात आलेला नाही.

घोषणेनुसार, यावर्षी हा कार्यक्रम आभासी नसून मूळ स्वरुपात होणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा दोन भागात आयोजित केला जाणार आहे. पहिला भाग 13 सप्टेंबरमध्ये तर दुसरा भाग 2 मे 2022 मध्ये होणार आहे.

2 भागात होणार हा महोत्सव
हा कार्यक्रम 13 सप्टेंबर आणि 2 मे रोजी अशा दोन भागात होणार आहे. फॅशन शोचा कार्यक्रम वर्षभर चालेल. तर दोन्ही कार्यक्रमाचा समारोप 5 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे. या महोत्सवाचे यजमान व अध्यक्ष कोण असतील हे अद्याप कळू शकलेले नाही. सप्टेंबरमध्ये होणारा हा कार्यक्रम कोरोना व्हायरस मार्गदर्शक सूचनेनुसार छोटा करण्यात येईल. इतर नेहमीसारखा मोठा असेल.

फंड रेझर इव्हेंटमध्ये भारताचा सहभाग
विशेष म्हणजे, मेट गाला फॅशन जगतातील सर्वात मोठे फंड रेजर कार्यक्रम आहे. भारताकडून प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण यांनी या इव्हेंटमध्ये भाग घेतला होता. मात्र 2019 मध्ये झालेल्या महोत्सवात ईशा अंबानी आणि नताशा पूनावाला यांनीदेखील यात भाग घेतला होता. तर नताशा 2018 मध्येही यात सहभागी झाली हाेती.

बातम्या आणखी आहेत...