आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील सर्वात प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटपैकी एक असलेल्या मेट गाला या इव्हेंटला 1 मे पासून सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्टने हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे आलियाचे मेट गाला इव्हेंटमध्ये हजेरी लावण्याचे हे पहिलेच वर्ष आहे. यंदा तिने या कार्यक्रमात डेब्यू केला आहे. यावेळी अभिनेत्रीने पांढऱ्या ड्रेसला प्राधान्य दिले. शोच्या रेड कार्पेटवरील तिचे फोटो सोशल मीडियावर येताच चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू केला. तिची थोरली बहीण शाहीन भट्टही तिचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही.
बहिणीने आलियाला म्हटले 'एंजल'
मेट गाला कार्यक्रमासाठी आलिया भट्टने पांढऱ्या मोत्याचा स्लीव्हलेस गाऊनला पसंती दिली. या डिझायनर गाऊनसह तिने कमीत कमी दागिने घातले होते. तर हातात ग्लव्ह्ज घातले होते, जे तिच्या लूकला पूरक होते.
आलियाची बहीण शाहीनने या कार्यक्रमातील आलियाचे काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, 'एंजल (परी).' यासोबतच पांढऱ्या हार्टसह एक इमोजीही शेअर केला. या पोस्टवर चाहत्यांनीही भरपूर कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले, 'गर्वाचा क्षण.'
यापूर्वी आलियाने तिच्या लूकची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली होती. तिने मेट गाला आउटफिटमधला एक मोनोक्रोम फोटो शेअर केला आहे आणि त्यावर लिहिले होते, 'आणि आम्ही तयार आहोत.'
यावर्षी मेट गाला न्यूयॉर्क शहरात आयोजित करण्यात आला आहे. आलिया व्यतिरिक्त, प्रियांका चोप्रा, किम कार्दशियन, केंडल जेनर, बिली आयलिश, रिहाना, गिगी हदीद, रोज आणि नाओमी कॅम्पबेल यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आपल्या सौंदर्याची झलक दाखवत आहेत.
पाहा मेट गाला इव्हेंटमधील आलियाचे खास फोटो -
आलिया भट्टचे आगामी चित्रपट
आलिया भट्ट काही दिवसांपूर्वीच ब्रह्मास्त्र या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. आता आलिया हॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज आहे. 'हार्ट ऑफ स्टोन' असे तिच्या हॉलिवूडपटाचे नाव असून तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सोफी ओकोनेडो, मॅथियास श्वेघोफर आणि जिंग लुसी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय ती करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात रणवीर सिंगसोबत झळकणार आहे. या दोघांसह धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. फरहान अख्तरच्या आगामी 'जी ले जरा'मध्ये ती कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रासोबत दिसणार आहे. हा रोमँटिक कॉमेडी-ड्रामा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी रिलीज होणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.