आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफॅशन इंडस्ट्रीतील अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा मेट गाला 2023 इव्हेंट न्यूयॉर्क शहरात सुरू झाला आहे. या इव्हेंटला बॉलिवूडमधून प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट यांनी हजेरी लावली आहे. प्रियांका गेल्या काही वर्षांपासून या सोहळ्याला हजेरी लावतेय. तर आलिया भट्टचे हे पहिलेच वर्ष आहे. यासोहळ्यात दोन्ही अभिनेत्रींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आहे.
प्रियांकाच्या 204 कोटींच्या हिऱ्यांच्या हारची चर्चा
‘मेट गाला इव्हेंट 2023’मध्ये प्रियांका तिचा पती निक जोनसबरोबर सहभागी झाली. या वेळी दोघांनी ब्लॅक कलरचे कपडे घातले होते. ब्लॅक डिझायनर गाऊनमध्ये प्रियांका खूपच सुंदर दिसली. रेड कार्पेटवर या कपलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे यावेळी प्रियांकाने 11.6 कॅरेटचा डायमंड नेकलेस घातला होता. मिळालेल्या माहितीनुसार प्रियांकाच्या नेकलेसची किंमत 25 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 204 कोटी रुपये आहे. ‘मेट गाला’नंतर प्रियांकाच्या या नेकलेसचा लिलाव केला जाणार आहे.
आलियाने घातला 1 लाख मोत्यांपासून तयार झालेला गाऊन
दुसरीकडे आलियाने मंगळवारी सोशल मीडियावर मेट गाला डेब्यूचे फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला. या सोहळ्याला आलियाने तब्बल एक लाख मोत्यांपासून तयार करण्यात आलेला गाऊन परिधान केला. प्रबल गुरुंग यांच्या टीमने हा सुंदर ड्रेस बनवला आहे. या ड्रेसमध्ये आलिया एखाद्या परीसमान दिसली. सोशल मीडियावर मेट गालाचे फोटो शेअर करत आलियाने लिहिले, 'मेट गाला - 'कार्ल लेजरफेल्ड: ए लाइन ऑफ ब्युटी. मला पुर्वीपासूनच प्रसिद्ध शिनैल ब्राइड्स आवडतात. प्रत्येक सीझनला कार्ल लेजरफेल्ड यांच्या टॅलेंटने सर्वात नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी आउटफिट तयार केले. आज रात्रीचा माझा लूक त्यापासूनच प्रेरित होता. विशेषत: सुपरमॉडेल क्लॉडिया शिफरचा 1992 चा शिनैल ब्राइडल लूक.'
ती पुढे म्हणते, 'मला असे काहीतरी करायचे होते जे वेगळे आणि खास भारतात बनवलेले असेल. प्रबल गुरुंग यांनी प्रेमाने आणि मेहनतीने 100,000 मोत्यांपासून हा सुंदर आउटफिट तयार केला आहे.'
एकाच चित्रपटात झळकणार आहेत आलिया आणि प्रियांका
फरहान अख्तरच्या आगामी ‘जी ले जरा’ या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. या दोघींसह कतरिना कैफदेखील या चित्रपटात दिसणार आहे.
आलियाचे चित्रपट
आलिया भट्ट काही दिवसांपूर्वीच 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. आता आलिया हॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज आहे. 'हार्ट ऑफ स्टोन' असे तिच्या हॉलिवूडपटाचे नाव असून तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सोफी ओकोनेडो, मॅथियास श्वेघोफर आणि जिंग लुसी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय ती करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात रणवीर सिंगसोबत झळकणार आहे. या दोघांसह धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
प्रियांकाचे चित्रपट
प्रियांका सध्या तिची अमेरिकन वेब सिरीज ‘सिटाडेल’मुळे चर्चेत आहे. ही सिरीज नुकतीच प्रदर्शित झाली. प्रियांकाच्या या अॅक्शन थ्रिलर मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. ‘सिटाडेल’मध्ये प्रियांकाबरोबर रिचर्ड मॅडेन, स्टॅनले टुसी आणि लेस्ली मॅनविलेदेखील आहेत. प्रियांकाचा रोमँटिक कॉमेडी ‘लव्ह अगेन’ही याच महिन्यात रिलीज होत आहे. या चित्रपटात प्रियांकासोबत सॅम ह्युघन आणि सेलीन डिऑनदेखील आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.