आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेट गाला 2023 हा इव्हेंट न्यूयॉर्क शहरात सुरू झाला आहे. यंदा अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. आलिया या इव्हेंटमध्ये एकटी सहभागी झाली तर प्रियांकाने पती निक जोनाससोबत या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. आलियाचे मेट गाला इव्हेंटचे हे पहिले वर्ष आहे, तर प्रियांका गेल्या काही वर्षांपासून या कार्यक्रमाला हजेरी लावतेय. यंदा ती पतीसोबत रेड कार्पेटवर अवतरली. यावेळी दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे घातले होते. सोशल मीडियावर दोघांच्या फोटो आणि व्हिडिओ चांगलेच पसंत केले जात आहेत.
प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सोहळ्याला हजेरी लावण्यापूर्वीचे खास फोटो शेअर केले आहेत. फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले, 'मे महिन्यातील पहिला सोमवार.' या फोटोत ती ब्लॅक गाऊनमध्ये दिलखेचक अंदाजात पोज देताना दिसतेय.
जगातील सर्वात प्रसिद्ध फॅशन शो मेट गालामध्ये थीमनुसार कपडे परिधान केले जातात. या वर्षीची थीम 'कार्ल लेजरफेल्ड: ए लाइन ऑफ ब्युटी' आहे, जी दिवंगत डिझायनर कार्ल लेजरफेल्ड यांना समर्पित आहे.
मेट गाला इव्हेंट आहे तरी काय?
मेट गाला हा 'मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स’ कॉश्च्युम इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारणारा कार्यक्रम आहे, जो दरवर्षी न्यूयॉर्क शहरात होतो. हा हाय प्रोफाईल कार्यक्रम दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी होतो. याची सुरुवात 1946 मध्ये झाली. या महोत्सवातून जमा होणारा निधी कॉश्च्युम इन्स्टिट्यूटसाठी वापरला जातो. या गालामध्ये दरवर्षी एक नवीन थीम असते, ज्यानुसार सेलिब्रिटी त्यांच्या ड्रेसची निवड करतात. कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व सेलिब्रिटी मोठ्या फॅशन डिझायनर्सचे कपडे परिधान करतात आणि रेड कार्पेटवर त्याचे सादरीकरण करतात.
यावर्षी मेट गाला येथे प्रसिद्ध फॅशन डिझायनर कार्ल लेजरफेल्ड: ए लाइन ऑफ ब्युटी यांचे कॉश्च्युम इन्स्टिट्यूटचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. कार्ल लेजरफेल्ड यांचे फेब्रुवारी 2019 मध्ये निधन झाले. मेट गालामध्ये या फॅशन लिजेंडला श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. या कार्यक्रमात यंदा 'इन ऑनर ऑफ कार्ल' ही थीम ठेवण्यात आली आहे.
ती परी अस्मानीची...:मेट गालामध्ये आलिया भट्टचे पदार्पण, सौंदर्याने केले सगळ्यांना घायाळ; बहीण शाहीन म्हणाली - 'एंजल'
जगातील सर्वात प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटपैकी एक असलेल्या मेट गाला या इव्हेंटला 1 मे पासून सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्टने हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे आलियाचे मेट गाला इव्हेंटमध्ये हजेरी लावण्याचे हे पहिलेच वर्ष आहे. यंदा तिने या कार्यक्रमात डेब्यू केला आहे. यावेळी अभिनेत्रीने पांढऱ्या ड्रेसला प्राधान्य दिले. शोच्या रेड कार्पेटवरील तिचे फोटो सोशल मीडियावर येताच चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू केला. तिची थोरली बहीण शाहीन भट्टही तिचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही. वाचा सविस्तर...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.