आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेटा गाला 2022:36 कोटींच्या ड्रेसमध्ये अवतरली किम कर्दाशियन, सब्यसाचीच्या डिझायनर गोल्डन साडीत दिसली नताशा पूनावाला

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा खास फोटो -

हॉलिवूडचा लोकप्रिय फॅशन इव्हेंट 'मेट गाला-2022' सोमवारी न्यूयॉर्कमध्ये पार पडला. केटी पेरी, किम कर्दाशियन, डकोटा जॉन्सन, गीगी हदीद यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर शानदार आणि विचित्र आउटफिट्समध्ये दिसले. तर सोशलाइट आणि बिझनेस वुमन नताशा पूनावालाने देखील मेट गालामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

नताशा सब्यसाचीने डिझाइन केलेली गोल्डन साडी परिधान करून कार्यक्रमात पोहोचली. यावेळी मेट गालाची थीम होती 'इन अमेरिका: अॅन अँथॉलॉजी ऑफ फॅशन' आणि ड्रेस कोड 'गिल्डेड ग्लॅमर' हा होता. मेट गालामधून केटी पेरी, किम कर्दाशियन, नताशा पूनावाला यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मेट गालामधील सेलिब्रिटींचे काही खास फोटो बघुयात -

किम कर्दाशियनने तिचा बॉयफ्रेंड पीट डेव्हिडसनसोबत मेट गाला 2022 मध्ये हजेरी लावली. 36 कोटींचा ड्रेस परिधान करण्यासाठी किमने 21 दिवसांत साडेसात किलो वजन कमी केले.
किम कर्दाशियनने तिचा बॉयफ्रेंड पीट डेव्हिडसनसोबत मेट गाला 2022 मध्ये हजेरी लावली. 36 कोटींचा ड्रेस परिधान करण्यासाठी किमने 21 दिवसांत साडेसात किलो वजन कमी केले.
नताशाने सब्यसाचीची गोल्ड हॅंडक्राफ्ट प्रिंटेड टुल साडी नेसली आहे. तिचा हा लूक अनिता श्रॉफ अदजानियाने स्टाईल केला आहे.
नताशाने सब्यसाचीची गोल्ड हॅंडक्राफ्ट प्रिंटेड टुल साडी नेसली आहे. तिचा हा लूक अनिता श्रॉफ अदजानियाने स्टाईल केला आहे.
एलन मस्कने यांनी त्यांची आई मेय मस्कसोबत मेट गालाला हजेरी लावली.
एलन मस्कने यांनी त्यांची आई मेय मस्कसोबत मेट गालाला हजेरी लावली.
लॉरी कम्बोला तिचा प्रियकर बॉबी डिगी ओलिसाने मेट गालाच्या रेट कार्पेटवर प्रपोज केले.
लॉरी कम्बोला तिचा प्रियकर बॉबी डिगी ओलिसाने मेट गालाच्या रेट कार्पेटवर प्रपोज केले.
मेट गालामधील बिली इलिश, ब्लेक लाइव्हली आणि रायन रेनॉल्ड्सचे फोटो.
मेट गालामधील बिली इलिश, ब्लेक लाइव्हली आणि रायन रेनॉल्ड्सचे फोटो.
प्रियांका चोप्राची मोठी जाऊ सोफी टर्नर आणि जो जोनासही या कार्यक्रमात पोहोचले होते. यावेळी गर्भवती सोफीने ब्लॅक आउटफिटमधून तिचे बेबी बंप दाखवले.
प्रियांका चोप्राची मोठी जाऊ सोफी टर्नर आणि जो जोनासही या कार्यक्रमात पोहोचले होते. यावेळी गर्भवती सोफीने ब्लॅक आउटफिटमधून तिचे बेबी बंप दाखवले.
डकोटा जॉन्सन गुच्चीच्या शीर जंपसूटमध्ये रेट कार्पेटवर दिसली.
डकोटा जॉन्सन गुच्चीच्या शीर जंपसूटमध्ये रेट कार्पेटवर दिसली.
गीगी हदीद 'वर्साचे'च्या ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर अवतरली
गीगी हदीद 'वर्साचे'च्या ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर अवतरली
Diorच्या सिल्क रेड सूटमध्ये दिसली कारा डेलेविंग
Diorच्या सिल्क रेड सूटमध्ये दिसली कारा डेलेविंग

मेट गाला मधील आणखी काही सेलिब्रिटींचे लूक बघुयात -

केटी पेरी वन-शोल्डर गाउनमध्ये दिसली.
केटी पेरी वन-शोल्डर गाउनमध्ये दिसली.
बातम्या आणखी आहेत...