आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MeToo:सेक्शुअल हरॅशमेंटच्या आरोपांच्या 2 वर्षांनंतर कामावर परतले नाना पाटेकर, भडकलेली तनुश्री दत्ता म्हणाली - 'प्लीज असे होऊ देऊ नका'

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात प्रकरण दाखल केले होते. मात्र जून 2019 मध्ये त्यांना क्लीन चिट देण्यात आली होती.

तनुश्री दत्ताद्वारे सेक्सुअल हरॅशमेंटच्या लावलेल्या आरोपांच्या दोन वर्षांनंतर नाना पाटेकर कामावर परतले आहेत. ते फिरोज नाडियाडवालाच्या एका वेब सीरीजमध्ये दिसणार आहेत. याविषयी तनुश्रीने राग व्यक्त केला आहे. तिने एका एंटरटेनमेंट वेबसाइटसोबत बोलताना राग व्यक्त करत म्हटले की, 'माझे शोषण, अपमान, त्रास देणे, धमकी देणे, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर हल्ला करणे, माझ्या घरी गुंड पाठवणे, गुंडांच्या माध्यमातून मला बाजूला सारणे, माझे करिअर आणि आयुष्य बर्बाद करणे आणइ दोन वर्षांच्या माध्या न्यायालयीन लढाईनंतरही या लोकांना मोठे प्रोड्यूसर्सचा सपोर्ट आणि ग्रँड कमबॅक मिळते'

माझ्यासाठी न्याय कुठे आहे?
स्पॉटबॉयसोबत बोलताना तनुश्रीने पुढे म्हटले की, 'मला कोणतीही चूक नसताना 12 वर्षे बॉलिवूडपासून दूर ठेवण्यासाठी मजबूर केले. आणि लोक सुशांत (सिंह राजपूत)साठी न्याय मागत आहेत. माझ्यासाठी न्याय कुठे आहे? प्लीज हे होऊ देऊ नका. मी स्वतः कमबॅकसाठी संघर्ष करत आहे तेव्हा या लोकांना पुन्हा काम मिळू देऊ नका.'

'भ्रष्ट सिस्टमसोबत लढता लढता थकले आहे'
तनुश्रीनुसार 'मी या भ्रष्ट सिस्टिमसोबत लढता-लढता थकले आहे, जे फक्त वाईट लोकांचा बचाव करते, तसेच त्यांना पुन्हा एकदा कामही देते. मी अजुनही माझ्या आयुष्यात संघर्ष करत आहे. माझ्याजवळ आता लढण्यासाठीही वेळ नाही. कोरोना व्हायरसमुळे यूएसमध्ये सर्व प्रकारचे इव्हेंट्स आणि शोज थांबले आहेत. यामुळे मला आयटी जॉबसाठी ट्रेनिंग घ्यावी लागेल. मी आता 9-5 चा आयटी जॉब करेल.'

'या लोकांनी माझा उदरनिर्वाह हिसकावला'
तनुश्रीने मुलाखतीमध्ये पुढे म्हटले, 'मी वयाच्या 16 व्या वर्षापासून कमाई करत होते आणइ आपल्या कुटुंबाला सपोर्ट करत होते. या लोकांनी माझे करिअर आणि उदरनिर्वाह हिसकावला आहे. मला त्रास देऊन आणि हरॅश करुन डिप्रेशनमध्ये पोहोचवले आहे. मी सुशांतप्रमाणे जीव दिला नाही. पण लोकांना अजुनही जाणिव नाही की, मी तेव्हा किती त्रास सहन केला आणि सामान्य जीवनात येण्यासाठी मला किती त्रास झेलावा लागला.'

नोव्हेंबर 2018 मध्ये लावला होता आरोप
नोव्हेंबर 2018 मध्ये तनुश्री दत्ताने नाना पाटेकरवर आरोप लावला होता की, 2008 मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या सेटवर त्यांनी तिला चुकीच्या पध्दतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर नाना पाटेकरांच्या हाताने फिल्म 'हाउसफुल 3'सह अनेक प्रोजेक्टस निघून गेले होते.

मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात प्रकरण दाखल केले होते. मात्र जून 2019 मध्ये त्यांना क्लीन चिट देण्यात आली होती. आता ते साजित नाडियाडवालाचे कजिन फिरोज नाडियाडवालाच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या RAW चे हेड रामेश्वरनाथ काव यांच्या बायोपिकमध्ये लीड रोल करताना दिसणार आहे. या वेब सीरीजला विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...