आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिल्लीत दोन महिन्यांहून अधिक काळापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन आता माजी पॉर्नस्टार मिया खलीफाने अभिनेत्री प्रियांका चोप्रावर निशाणा साधला आहे. आपल्या एका पोस्टमध्ये तिने प्रियांकाला उद्देशून मिसेस जोनास याबद्दल काहीच बोलणार नाहीत का? असा प्रश्न विचारला आहे.
बेरुत उद्धवस्त झाले आणि शकीरा गप्प होती?
ऑगस्ट 2020 मध्ये लेबनानची राजधानी बेरुत येथे एक मोठा स्फोट झाला होता. त्यात 180 पेक्षा जास्त लोक ठार आणि 6000 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. त्यानंतर शकीराने लेबनान बेस्ड फॅशन डिझायनर झुहेर मुरादच्या सहकार्याने पीडितांसाठी निधी जमा करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी मिया खलिफाने शकीराचे हे सर्वात कमी योगदान असल्याचे म्हटले होते. मियाने सोशल मीडियावर लिहिले होते की, शकीराचे पूर्वज लेबेनानमधील असल्याने तिने मोठी मदत करायला हवी होती.
याचाच संदर्भ घेत मियाने आता आपल्या ताज्या पोस्टमध्ये लिहिले, ‘मिसेस जोनास’ तुम्ही कधी बोलणार आहात? मला उत्सुकता लागून राहिलीय. बेरुत उद्धवस्त झाले, त्यावेळी शकीरा शांत होती, हे मला तसं वाटतंय असे मियाने म्हटले आहे.
दोन महिन्यांपूर्वी प्रियांकाने केले होते आंदोलनाचे समर्थन
दरम्यान डिसेंबर महिन्यात प्रियांकाने शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणारी एक पोस्ट शेअर केली होती. प्रियांकाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले होते की, 'आमचे शेतकरी हे भारताचे अन्न सैनिक आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत. यामधून काहीतरी मार्ग काढावा लोकशाही देश म्हणून हे संकट लवकरात लवकर दूर होईल याची काळजी घेणे आवश्यक आहे.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.