आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शत्रुत्व आणि मास्क दोन्ही विसरले राखी-मीका:15 वर्षांनंतर Kissing कॉन्ट्रोव्हर्सी विसरुन मीका-राखीने घेतली गळाभेट, एकमेकांचे कौतुकही केले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बळजबरी किस केल्याने मीका सिंगला झाली होती अटक

ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत आणि गायक मीका सिंग यांच्यात 2006 मध्ये झालेला वाद सर्वांनाच माहीत आहे. मीका सिंगने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये राखी सावंतला जबरदस्ती किस केले होते. ज्यामुळे दोघांमध्ये प्रचंड वाद झाले होते. मात्र आता एवढ्या वर्षांनी हे दोघेही जुना वाद विसरले आहेत. कारण मागील शत्रुत्व विसरुन राखी आणि मीका एकमेकांची गळाभेट घेताना नुकतेच पॅपराजींच्या कॅमे-यात कैद झाले. यावेळी हे दोघेही एकमेकांचे कौतुक करताना दिसले. इतकेच नाही तर राखी मीकाच्या पायादेखील पडली. पण या दोघांकडून यावेळी एक चुक झाली. ती म्हणजे कोरोना काळात हे दोघेही मास्कविना फोटोग्राफर्ससमोर आले होते.

राखीला बघून थांबला होता मीका
राखी एका कॉफी शॉपबाहेर पॅपराजींसोबत बोलत होती. तेथूनच जात असलेला मीका राखीला पाहिल्यावर तिला भेटण्यासाठी आला. त्याला पाहिल्यावर राखी देखील 'सिंग इज किंग' असे ओरडली. त्यावर मीकाने तिला सांगितले की, मी येथून जात असताना तुला पाहिले आणि मी दुर्लक्ष करु शकलो नाही. यावेळी मीकाने राखीच्या बिग बॉसमधील कामाचे कौतुक केले. तो म्हणाला, 'बिग बॉस 14 हिट झाला आहे तर तो फक्त आणि फक्त राखीमुळेच हिट झाला आहे.' तर कोरोना काळात मीका सिंग गरजू लोकांना मदत करताना दिसला आहे. या कामासाठी राखीनेही त्याचे तोंडभरुन कौतुक केले. राखीने पॅपराजींना 'आता आम्ही दोघे मित्र आहोत' असेही सांगितले

बळजबरी किस केल्याने मीका सिंगला झाली होती अटक
मीका आणि राखी यांच्यात 2006 मध्ये वाद झाला होता. मीकाने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत राखीच्या परवानगी शिवाय तिला किस केले होते. त्याचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एवढेच नाही तर राखीने मीका सिंगच्या विरोधात गैरवर्तनाचा गुन्हा दाखल केला होता. तिच्या तक्रारीवरुन मीकाला अटकदेखील झाली होती.

बातम्या आणखी आहेत...