आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेरणादायक:पत्नी अंकिताच्या सांगण्यावरुन लांब दाढी असलेला शेतकरी बनला मिलिंद सोमण, शेअर केले घरी पिकवल्या फळभाज्याचे फोटो  

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिलिंदने आपल्या ग्रीन हाऊसमध्ये काकडी, वांगी आणि शिरोळी या भाज्यांची लागवड केली आहे.

54 वर्षीय अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. पण फिटनेससोबतच त्याला गार्डनिंगचीही आवड असल्याचे आता समोर आले आहे. शुक्रवारी मिलिंदने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने घरच्या गरी काही फळभाज्यांची शेती केल्याचे त्याने सांगितले आहे. पत्नी अंकिताच्या सांगण्यावरुन घरच्या घरी शेती केल्याचे त्याने म्हटले आहे.

स्वत:ला दाढीवाला शेतकरी म्हटले 

'अखेर एक लांब दाढी असलेला शेतकरी, अंकिताची इच्छा होती तसाच. स्वत:च्या हाताने उगवलेल्या भाज्या खाण्यात खरंच एक आनंद आहे. लॉकडाऊनमध्ये एक लहानसं ग्रीन हाऊस किंवा भाज्यांचं घरं', असे कॅप्शन मिलिंदने या फोटोला दिले आहे.

चार फोटो, एक व्हिडीओ केला शेअर

मिलिंदने यासोबत हॅपीनेस, फूड, व्हेजिटेबल्स, ग्रीन, फिटनेस, हेल्थ आणि लव्ह लिटिल वाईफ असे हॅशटॅग दिले आहेत. मिलिंदने चार फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने त्याच्या ग्रीन हाऊसमध्ये काकडी, वांगी आणि शिरोळी या भाज्यांची लागवड केल्याचे दिसते. 

बातम्या आणखी आहेत...