आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्हा एकदा न्यूड झाला मिलिंद:समुद्र किना-यावर न्यूड होऊन धावताना दिसला बर्थडे बॉय मिलिंद सोमण, नेटक-यांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिलिंद सोमणच्या या फोटोवरुन सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.

मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणचा आज (4 नोव्हेंबर) वाढदिवस असून त्याने वयाची 55 वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र नेहमीप्रमाणेच त्याने यंदाच्या वाढदिवशीदेखील एक हैराण करणारी गोष्ट केली आहे. मिलिंदने सोशल मीडियावर चक्क स्वतःचा एक न्यूड फोटो शेअर केला आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची एकच चर्चा रंगली आहे.

या फोटोत तो न्यूड होऊन बीचवर धावताना दिसत आहेत. या फोटोला त्याने ‘हॅप्पी बर्थ डे टू मी…#55’ , असे कॅप्शन दिले आहे. हा फोटो त्याची पत्नी अंकिता कुंवर हिने क्लिक केला.

पत्नी अंकिताने लिहिली पोस्ट
मिलिंदची पत्नी अंकितानेही मिलिंदला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अंकिताने लिहिले- ''माझे हृदय व आत्मा असलेल्या व्यक्तीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुझ्यावर प्रेम करते. 12 किमीच्या रनिंगनंतर टोमॅटोसारखा लाल झालाय.''

फिटनेस फ्रिक आहे मिलिंद सोमण
मिलिंद सोमणला फिटनेस फ्रिक म्हणून ओळखले जाते. तो आठवड्यातून 3 ते 4 वेळा रनिंग करतो. एका मुलाखतीत मिलिंदने सांगितले आहे की, वयाच्या 9 व्या वर्षी तो राष्ट्रीय जलतरणपटूही होता. वयाच्या 23 व्या वर्षीपर्यंत तो स्विमिंगमध्ये अॅक्टिव होता. पोहणे सोडल्यानंतर 38 वर्षांचा होईपर्यंत त्याने कोणतीही फिजिकल अॅक्टिव्हिटी केली नव्हती. परंतु त्याचा त्याचा वजनावर परिणाम झाला नाही. वयाच्या 19 व्या वर्षापासून त्याचे वजन आजपर्यंत सारखे आहे.

नेटक-यांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया
मिलिंदचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटक-यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. त्यावरुन अनेकांनी मीम्स बनवले. काहींनी मिलिंदचा मॉडेलिंगच्या काळातील न्यूड फोटो शेअर केले, तर काहींनी त्याला अंडरगार्मेंट्स दिले. मिलिंद आणि अंकिता यांनी नेहमीप्रमाणे ट्रोलर्सची चिंता केली नाही. दोघेही या खास दिवसाचा आनंद लुटत आहेत.