आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता मिलिंद सोमण लवकरच एका वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. आल्ट बालाजीच्या ‘पौरषपूर’ या वेब सीरिजमध्ये मिलिंदची महत्त्वाची भूमिका असून त्याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या वेब सीरिजमध्ये झळकणारे सर्वच कलाकार एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे.
आल्ट बालाजीने मिलिंदचा फर्स्ट लूक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मिलिंद शर्टलेस दिसत असून त्याने नाकात नोज रिंग, कपाळी कुंकू लावले आहे. या वेब सीरिजमध्ये मिलिंदने बोरीस नावाचे पात्र साकारले आहे. बोरीस हे पात्र तृतीयपंथी असल्याचे दाखवण्यात आले आहे.
A kingdom where to love is to go to war! Witness love, lust, betrayal and the ultimate clash for gender equality. #Paurashpur awaits its revolution! Trailer out on 8th Dec, 12 pm on #ALTBalaji@ektarkapoor @milindrunning @annukapoor_ #ShilpaShinde @SalathiaSahil #AnantJoshi pic.twitter.com/uiOO9uUhmI
— ALTBalaji (@altbalaji) December 6, 2020
पौरषपूर या वेब सीरिजमध्ये मिलिंद सोमणसोबतच अभिनेत्री शिल्पा शिंदे (राणी मीरावती), शाहीर शेख (वीर सिंह), साहिल सलाथिया (भानू), अन्नू कपूर (राजा भद्रप्रताप), पोलोमी दास (काला), आदित्य लाल (राजकुमार रणवीर) आणि अनंत विजय जोशी (राजकुमार आदित्य) हे कलाकार दिसणार आहेत. या शोचे दिग्दर्शन सचिंद्र वत्स हे करत आहेत.
या वेब सीरिजचे कथानक पुरुषप्रधान संस्कृतीवर आधारित आहे. याचा ट्रेलर 8 डिसेंबरला प्रदर्शित करण्यात येणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.