आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणी:मिलिंद सोमनने शेअर केला मॉडेलिंगचा पहिला फोटो, सांगितले - तेव्हा एका तासासाठी मिळाले होते 50 हजार रुपये

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिले ही असाइनमेंट मला जमणार नाही असे म्हटले होते.

अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणने आपल्या चाहत्यांसोबत एक खास आठवण शेअर केली आहे. त्याने सोशल मीडियावर 31 वर्षे जुना फोटो शेअर केला आहे. सोबतचा हा त्याच्या पहिल्या मॉडेलिंग असाइनमेंटचा फोटो असून त्या काळात अतिशय लाजरा बुजरा होतो, अशी आठवण त्याने सांगितली आहे.

‘1989 मध्ये मी सर्वात पहिल्या जाहिरातीसाठी शूट केले होते. त्यापूर्वी मला मॉडेलिंगमध्ये करिअर करता येते हे देखील माहिती नव्हते. माझ्यासाठी तो सरप्राइज फोन कॉल होता. एका व्यक्तीने मला कुठे तरी पाहिले होते आणि त्याच्यासाठी फोटोशूट करावे असे तो म्हणाला होता,’ असे मिलिंदने सांगितले.

पुढे मिलिंद म्हणाला, ‘त्यावेळी मी सर्वांशी बोलायला लाजायचो. पहिले मी मला जमणार नाही असे म्हटले. पण जेव्हा मला एक तासासाठी 50 हजार रुपये ऑफर करण्यात आले तेव्हा मी तयार झालो. सरना बहलचे आभार.’

पहिल्यांदा तृतीयपंथीची व्यक्तिरेखा साकारणार मिलिंद
मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केल्यानंतर मिलिंदने छोट्या पडद्याकडे आपला मोर्चा वळवला. टीव्हीवर सी हॉक्स आणि कॅप्शन व्योम या मालिकांमध्ये तो झळकला. त्यानंतर रुल्स -प्यार का सुपरहिट फॉर्मुला, जुर्म, बाजीराव मस्तानी आणि शेफ या चित्रपटांमध्ये त्याने काम केले. आता मिलिंद आपल्या आगाम वेब सीरिजच्या प्रतीक्षेत आहे. यात तो योद्धा साकारतोय. विशेष म्हणजे या वेब सीरिजमधील त्याचे पात्र तृतीयपंथीचे असून बोरिस हे त्याचे नाव आहे. मिलिंदच्या या वेब सीरिजचे नाव पौरुषपुर आहे. 29 डिसेंबर रोजी ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...